Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
नंतर रघोजी भोसल्याने पेशवे याकडे वकील पाठवून बोलणे कळविलें की, तुह्मी राज्यरीतीप्रमाणें जी वर्तणूक करितां ती फार उपयोगी आहे असें आता मला कळतें. अशी मनाची निर्मळता दाखविल्यावर पेशवे यांनीही बंगालप्रांत रघोजीकडे ठेवणे बरोबर आहे, असें मनांत आणून रघोजीशी सल्ला करून भेटून त्यास आपलेबरोबर मोंगलाईकडे नेले होते. पुढे देशीं अर्बा अर्बैन साली आल्यावर महाराज सातारकर यांचे विद्यमानें तह ठरला. याचा प्रकार खाली लिहिला आहे. रघोजीचा बंगाल्यांतून पराभव केल्यावर बादशहानें आपल्यास माळव्याचा अधिकार देऊ केला होता तो कायम करण्याकरितां माळव्यांत पेशवे आले. तेव्हां महमदशहा बादशहा यानें विचार केला कीं, येवढा मुलूख दिला ह्मणजे आपली मानहानी होईल. यास्तव लोकांत प्रसिध्द होण्याकरितां आपला मुलगा अहमदशहा आहे, याचे नावे सनद करून वहिवाट पेशव्यास सांगावी असें ठरविले. नंतर माळवा प्रांत देऊन पेशवे यांनी कोणत्या रीतीनें बादशाहाशी वागावें असेविषयी कबुलायत पेशवे याजकडून घेतल्याचे मालकम साहेबाचे बुकांत हकीकत आहे, त्यावरून खाली लिहिल्याप्रमाणे उतारा घेतला आहे. बादशहानी कृपावंत होऊन नोकर बाळाजीराव व चिमणाजीराव यांस माळवे सुभ्याचे काम सांगितले. त्यास आह्मी बाळाजीराव व चिमाजीराव खाली लिहिल्याप्रमाणे नोकरी बजाविण्यास तयार आहों. बादशहाचे हुजूरास आह्मांस पदवी प्राप्त होऊन आमची इभ्रत वाढावी असा आमचा अर्ज आहे. आह्मी लिहून देतो की, माळवा सोडून जाऊन दुस-या देशावर स्वारी करणार नाही व लुटालूट करून देश उद्ध्वस्त करणार नाही. कोणी मराठे सरदार नर्मदेच्या पलीकडे हिंदुस्थानातील सुभ्यांत जाणार नाहीं. याची जबाबदारी आह्मी आपले माथ्यावर घेतों. कोणी तरी लायक मराठी सरदार पांचशे स्वारांनिशी बादशहाच्या हुजुरास चाकरीस हमेशा राहील. या सालीं जो ऐवज आह्मास बादशहानी इनाम दिला तो आह्मी ग्रहण करितों; परंतु पुढे आह्मी बादशाही दरबारांतून छदाम मागणार नाही. बादशाही दरबार पृथ्वीचा मध्य आहे. आह्मी आपल्या कामांत बादशहाचे सेवेंत हमेशा तत्पर राहूं. जेव्हा जेव्हां सरकारचें गाजी सैन्य बाहेर निघेल तेव्हा तेव्हा चार हजार स्वारांची टोळी त्या लष्कराबरोबर आह्मी पाठवून देऊ; परंतु जर जास्ती लोकांचे जरूर असेल तर हुजूराहून त्याचा खर्च मिळावा. चमला नदीचे पलीकडील जमीनदारांपासून ठरलेल्या पेशकश खेरीज एक छदाम आह्मीं जास्ती घेणार नाहीं. चमला नदीच्या पलीकडील मुलुखांत कोणा एखाद्या लहानसहान जमीनदाराचें शासन केल्यास हुजूर फर्मावतील तर आह्मी चार हजार स्वार तिकडे पाठवूं. हे लष्कर तें काम तडीस नेण्यास हरप्रकारया नेतील. किल्लेदार लोकांच्या जहागिरी, कोट, गांव, मुत्फीक यांचे हक्क, इनाम व जमिनी व पेशकश व धर्मादाय वगैरे हुजूरच्या देणग्यामध्यें आह्मी व्यत्यय आणणार नाहीं. ज्या ज्यास त्या दिल्या आहेत त्यांनी त्यांनी उपभोगून बादशहाशी हमेशा बढती व्हावी या हेतूनें दुवा देत असावें, ह्मणून त्या आह्मी चालवू. येणेंप्रमाणें पेशवे यांनी बादशहाशी कबुलात लिहून देऊन पुढे पेशवे यांच्या स्वा-यापासून कांही एक उपसर्ग होणार नाही अशी खातर तसली करण्यासाठी मराठ्या सरदारांनी खाली लिहिल्याप्रमाणें कबुलात महमदशाहा बादशाहास लिहून दिली.