Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
निजामाचे मुलखांत आपला प्रवेश आहे तो नाहीसा न व्हावा असे असता प्रतिनिधिं यांनी त्याविरुध्द केलें, यामुळे प्रतिनिधीशी वाकडे पडिले. हे वर्तमान निजामुन्मुलूक यास कळताच त्यानें चंद्रसेन जाधवराव, रंभाजी निंबाळकर, दाभाडे व पिलाजी गाइकवाड हे सरदार आपल्याला अनुकूल आहेतच, व कोल्हापूरचा मुख्य संभाजी तोही वश आहे. त्यास शाहू व संभाजी यांजमध्ये पुन्हा कलह उत्पन्न करावा यास हा वेळ चांगला आहे असें समजून संभाजीस निम्में हिस्सा मागावयास लावून तो कज्जा मोडावयाशी आपण मध्यस्थ होऊन न्याय मी करीन तोपर्यंत पैसा चौथाई व सरदेशमुखीचा शाहूस देण्याचा यास अटकाव केला. ही लबाडी बाजीरावानी शाहूचे मनात पक्की भरवून लढाईच करावी अशी शाहूमहाराजाची आज्ञा घेतली. नंतर छ १ सफर रोजी (२७ आगस्ट १७२७) बाजीराव सोो निजामुन्मुलुकावर स्वारीस निघाले. तेव्हां प्रथम निजामाचे लष्कराची गांठ पडली. तेव्हां त्याशीं हलकी लढाई देऊन पळ काढण्याचा रबा आकार दाखवून खानदेशात शिरला. निजाम आपलेजवळ आहे असें समजून कांही लोक ब-हाणपूरचे वाटेकडे त्यास ठकवावयाशी ठेऊन आपण फौजेसुध्दां गुजराथेंत शिरून मुलूख लुटला. आणि तेथील अधिकारी सरबुलंदखान यास असे समजाविलें की, आह्मी हे कृत्य निजामुन्मुलुकाचे मसलतीनें करितो. निजाम ब-हाणपुराकडे आला तेव्हां त्यास कळलें की, आह्मांस मराठ्यांनी ठकविले. नंतर तो माघारा फिरून पुणें जाळून टाकावें असा विचार करून तो अहमदनगरास येईतोपर्यंत अगोदरच त्यास कळलें की बाजीराव करवंदबारीने येऊन मुलूख लुटला. तेव्हा निजाम माघारा फिरून गोदावरीपलीकडे गेला. तेथें बाजीरावाची गांठ पडून प्रथम हलकी लढाई झाली. नंतर ज्या ठिकाणी दाणापाणी नाहीं असे जागी निजामास घुलवीत नेऊन अगदी लढून जेर केले. ही लढाई छ २५ रजब रोजीं (२५ फेब्रुवारी १७२८) पालखेड येथे झाली. तेव्हां निजामास तह करणे भाग पडलें. नंतर तहाचे बोलणें चालता बाजीराव पेशवे यांनी कोल्हापूरकर संभाजी राजे आमचे हाती द्यावे व आमचे मराठे लोक वसूल जमा करणारे यांशी हरकत न करावी. याकरितां त्या मुलुखातील किल्ले आमचे स्वाधीन असावेत. तेव्हा निजामाने संभाजीशिवाय बाकी गोष्टी कबूल केल्या. संभाजीस आह्मी पन्हाळ्यास पोहचवितों असें निजामानें सांगितल्यावरून पेशवे याणी मान्य करून छ ५ साबान रोजी (६ मार्च १७२८) मुंगी पो शेवगाव या मुक्कामी तह ठरून परस्परांशी भेटी झाल्या. संभाजीराजे दक्षिणेत येऊन आपले स्वस्थळास गेले. आवजी कवडे यास छ २९ जिल्हेज रोजी (२५ जुलै १७२८) फौजेची सरदारी सांगून तैनात १५०० रुपये केली. नानासाहेब ह्मणजे बाळाजी बाजीराव पेशवे यांची मुंज माघ शु ॥ ११ दिवशी झाली. दमाजी थोरात याणें पुन्हां बंड केले होते. त्याजवर स्वारी करून धरून आणून पुरंदरावर ठेविला, तो तेथें मयत झाला.