Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

त्याणें पिलाजी गाइकवाड सुरतेजवळ होता, त्याशी सख्य करून निश्चय केला की, आपण उभयता मिळून अंमदखानास मारूं. त्यावेळेस पिलाजीस निजामुन्मुलूकाचें सांगणें, माझे पुतण्याचें साहाय्य करावें, असे आलें. त्यावरून पिलाजी गाइकवाड यानें विचार केला कीं, जो पक्ष सबळ, त्याचें साहाय्य करूं. मग प्रथम सुरवात झाल्याबरोबर निघून माही नदीपलीकडे आरासा गांवीं पोहोंचला. तेथें अंमदखानाचे लष्कराची गांठ पडली. सुरतवाल्याजवळ तोफा फार होत्या. यामुळे अमेदखानाचा पराभव होऊं लागला. तेव्हां पिलाजीनें सुरतवाल्यास सांगितलें की, तुह्मी पाठीस लागा, मी तोफा सांभाळितों. त्याप्रमाणें तो पाठीस लागला. तेव्हां पिलाजी गाइकवाड याणीं तोफांची तोंडे उलटी फिरवून अंमदखानाचा पक्ष धरल्यामुळे सुरतवाल्यावर दोन्हीं लष्करें पडली. त्याचे लोक फार मेले. बाकी राहिले लोकांसुध्दा पळण्यास अवसर सांपडेना, असे पाहून तो फौजदार आपले हातें आपल्यास तोडून घेऊन मरण पावला. नंतर कंठाजी कदम, पिलाजी गायकवाड दोघे मिळून गुजराथची चौथाई घेऊ लागले. परंतु दोघांत मुख्यत्व कोणी करावें याविषयी तंटा उत्पन्न होऊन दोघे लढू लागले. तेव्हां अंमदखान यानें दोघांचीही समजूत काढून माही नदीचे आग्नेय दिशेकडील मुलखांत चौथाई पिलाजीनें घ्यावी व वायव्य दिशेस कंठाजीनें घेत जावी, असें ठरविलें. त्याप्रमाणें पिलाजी सुरतेकडे गेला व कंठाजी खानदेशांत आपले जहागिरीचे जागी आला. असे अमेदखानाचें प्राबल्य झालेलें पाहून दिल्लीचे बादशहानें तें बंड मोडण्याकरितां सरबुलंदखानाबरोबर लष्कर देऊन पाठविलें. तेव्हां अमेदखानानें आपले कुमकेस मराठे सरदार बोलाविले.१९ १९+ते येण्यास कांही अवकाश लागल्यामुळें अमेदखानानें अहमदाबादेस कांही फौज ठेवून मागें हटला. इतक्यांत मराठी फौज येऊन पोहोंचली. नंतर माघारा उलटून मराठे सरदारासहीत सरबुलंदखानाचे बिनीवाल्यावर जाऊन पराभव केला. त्यांत मराठे लोक बहुत मेले. यामुळे मराठे लोक पुन्हां त्यास अनुकूल होईनातसे झाले. मग अंमदखान पेंढारी लोकांप्रें॥ वागूं लागला. त्याबरोबर मराठे सरदार कंठाजी कदम व पिलाजी गाइकवाडही पर्जन्यकालपर्यंत लुटीत होते. यांप्रें॥ गुजराथचें वर्तमान असतां, व मोंगल लोकांत कलह लागला, ही संधी बाजीराव पेशवे यांनी पाहून दोनवेळ माळव्यांत स्वा-या करून द्रव्य बहुत नेलें. या स्वारीबरोबर अंबाजीपंत व अंताजीपंत भानू व अन्याबा ह्मणजे नारो गंगाधर मुजुदार व आवजी चिटणीस होते, व बापूजी भीमसेन पारसनवीस वगैरे फौजेसुध्दां गेले होते.