Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

सु ॥ सीत अशरीन मया व अलफ, सन ११३५
फसली, अवल साल २२ रमजान. २५ मे
१७२५, अधिक ज्येष्ठ वद्य ९ शके १६४७.

छ ५ जिलकाद रोजी (७ जुलै १७२५) साता-याहून निघून छ १४ पर्यंत (१६ जुलै १७२५) माहुलीस होते. तेथून पुढें अपसिंग्यास होते. छ ७ जिल्हेज (८ आगष्ट १७२५) सुप्याकडून सासवडाहून पुण्यास आले. छ २३ जिल्हेज रोजीं (२४ आगष्ट १७२५) पुन्हा साता-यास गेले ते छ १ मोहरमपर्यंत (२९ आगष्ट १७२५) फिरत फिरत छ म॥ पुण्यास आले. छ १ सफर रोजीं (२८ सप्टेंबर १७२५) मुक्काम पुण्यास होता. छ १ रविलावल रोजी (२७ अक्टोबर १७२५) मौजे पिंपळेनजीकसासवडावरून साता-यास जाण्याकरितां त॥ २४ रोजी (२२ अक्टोबर १७२५) निघाले. साता-यास गेल्यानंतर फत्तेसिंग भोसले यास कर्नाटकचे स्वारीस तुळजोजी राजे तिकडे होते त्याजकडे पाठविलें. त्याजबरोबर महाराजांनी बाजीराव पेशवे व प्रतिनिधि, दाभाडे व रघूजी भोसले सेनासाहेब सुभा व सरलष्कर असे सरदार देऊन पन्नास हजार फौज पाठविली. संताजी घोरपडे पुरातन सेनापति यांचे पुत्र संभाजीकडे गेले, ते तिकडेच राहिले. त्यांच्या घराण्यांतील पिराजी व मुरारराव घोरपडे गुत्तीचें संस्थान रक्षून होते, त्यांस सेवा करून दाखवावी ह्मणून महाराजांनी लिहिल्यावरून तेही फत्तेसिंग याजबरोबर कर्नाटकांत गेले. सुरापूर, चित्रदुर्ग, गदग, लखमेश्वरापासून पूर्वीच्या खंडण्या घेतल्या. सालाबाद घे-याचा ठराव करून, शिवाय हुजूरची ठाणी पूर्वीची होतीं ती सोडविली. त्रिचनापल्लीस दादखान ह्मणून होता त्याशीं लढाई करून संस्थान घेतले, नंतर परत आले. छ २२ जमादिलाखर (१५ फेब्रुवारी १७२६) अबदुल गफर पठाण याची व पेशवे यांची भेट बेदवटी येथें झाली होती. कर्नाटकचे स्वारीहून श्रीमंत छ २६ रमजान (१७ मे १७२६) रोजी परत आले.२०