Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
बाजीराव याचा निरोप त्यास आला कीं आह्मांस गुजराथची चौथ व सरदेशमुखी द्याल तर माझा भाऊ तुमचे मुलखाचा बंदोबस्त करील. त्यावरून सरबुलंदखानानें तें बोलणें मान्य केलें. मग त्यानें सुरत खेरीजकरून बाकी मुलखाची जकातसुध्दां चौथ व सरदेशमुखीं दिल्ही. अमदाबाद शहर सबंध कांही दिल्हे व कांही न दिले असें केलें. या अमलाबद्दल २५०० अडीच हजार स्वार ठेऊन मुलखाचा बंदोबस्त पेशवे यांनीं ठेवावा असें कबूल केलें. शाहूमहाराज एके दिवशीं शिकारीस गेले असतां उदाजी चव्हाण याजकडील मारेकरी भेटले. त्यांच्यानें मारवेना. महाराजांनी त्यांस सोडलें. परंतु हें कृत्य चव्हाणाचें, सबब त्याजवर प्रतिनिधीस पाठविलें. तेव्हा चव्हाणाचा पक्ष संभाजीनें धरिला. तेवेळेस प्रतिनिधींनीं पूर्वी निजामुन्मुलूक याशीं मसलत केल्यामुळें शाहूमहाराजाचें मनांतून तो उतरला होता. त्यास असें वाटलें कीं, यासमयी संभाजीचा पराभव आपण केला तर आपली योग्यता वाढेल. ह्मणून त्यानें फौजसुध्दा एकदम संभाजीच्या तळावर येऊन संभाजीस व उदाजी चव्हाण यास पन्हाळ्याकडे पिटऊन लाविलें. तेव्हां संभाजीचीं बायकामाणसें सांपडली ती धरून साता-यास आणिली. त्यांत ताराबाई व तिची सून राजसबाई सांपडली. ताराबाई बोलली की, तुह्मीं व ते सर्व एकच आहा. मला कोठें तरी कैदेतच राहणें आहे. त्यापक्षी मी येथेंच राहतें. असें भाषण झाल्यावर सातार किल्ल्यावरील वाडा नीट करून खर्चाचा बंदोबस्त करून व लवाजिमासुध्दां व्यवस्था लावून यादो गोपाळ कारभारी नेमून ताराबाईस व राजसबाईस किल्ल्यावर ठेविलें व बाकीचीं माणसें परत ठिकाणी पावतीं केली. हें वर्तमान शके १६५१ साली झालें. आनंदराव महादेव खासनीस याजकडून अपराध झाला, सबब त्याचे सावत्र बंधू यशवंत महादेव यास खासनिशी व पोतनिशी सांगून इनाम सरंजाम वगैरेविषयीं सनदापत्रें दिली. उदाजी चव्हाण बंड करून चव्हाणचौथाई अशी बाब गांवगन्ना घेत होता. जबरीनें त्याजवर यशवंत महादेव यास पाठवून त्याचें पारपत्य केलें. सेखोजी आंग्रे वारले शके १६५१ सालीं, सबब संभाजीस सरखेल पदाची वस्त्रें झाली शके १६५२. सबब संभाजीनें येसाजीस विजयदुर्ग सुवर्णदुर्ग सुभा सांगून पे॥ सरदारी मानाजीस सांगितली. त्याचें बनेना. तो फिरंग्याकडे गेला. त्यानें तुळाजीस दिवाणगिरी देऊन कुलाब्यास आलें. छ २९ जमादिलाखर माघ शु॥ १ सलासीन सालीं (८ जानेवारी १७३०) त्र्यंबकराव दाभाडे यास पदाची वस्त्रें झाली.