Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

सु ॥ सलासीन मया व अलफ, सन ११३९ फसली,
अवल साल छ ७ जिल्काद २५ मे १७२९,
ज्येष्ठ शुध्द ९ शके १६५१.

छ १५ जिल्काद रोजी (१२ जून १७२९) पिलाजी जाधवराव याशी तगीर केले, मु॥ गदेकोटा. हिंदुस्थानचे स्वारीहून श्रीमंत बाजीरावसाहेब पुण्यास आले. छ १ मोहरम (१७ जुलै १७२९) पिलाजी जाधवराव याचा सरंजाम राणोजी शिंदे यास देऊन तेच वेळेस पालखी दिली. व पिलाजीची सरदारीही त्याच दिवशीं शिंद्यास दिली, छ ५ मोहरम (२१ जुलै १७२९). श्रीमंताची स्वारी छ १५ मोहरम रोजीं (३१ जुलै १७२९) साता-याहून निघाली. छ १६ मोहरम (१ आगस्ट १७२९) चिमाजी अप्पा व नानासाहेबसुध्दां साता-याहून निघाले ते साता-याहून छ ८ रविलाखर (२० अक्टोबर १७२९) रोजी सुप्यास गेले. चिमाजी अप्पा छ २० र॥ खर रोजीं (१ नोव्हेंबर १७२९) निघाले ते फलटन देशी जाऊन उरमुडीस येऊन छ १४ जमादिलाखर रोजी (२४ डिसेंबर १७२९) पुण्यास आले. लग्नाचे आमंत्रणाकरितां गेले असावेत. छ १२ रजब रोजीं (२१ जानेवारी १७३०) नानासाहेब यांचें लग्न माघ शु॥ १४ रोजी झालें. रास्ते भिकाजी नाईक यांची कन्या गोपिकाबाई. मंडप जुने कोटांत दिला होता. छ १ रजब माघ शु॥ ३ मंदवारीं (१० जानेवारी १७३०) शनवारचा वाडा बांधावयास आरंभ केला. पायागड घेतल्याचें वर्तमान आलें, छ २३ रजब (१ फेब्रुवारी १७२९). छ १४ साबान रोजीं (२१ फेब्रुवारी १७३०) श्रीमंत उंबरजेस गेले होते. अखेर सालपर्यंत तेथें होते. महाराज यांचा मुक्काम तेथें होता, सबब गेले होते. र॥ वल महिन्यास (सप्टेंबर १७२९) अप्पा स्वारीस निघून गुजराथेत गेले. व छ १३ रमजान रोजी (२२ मार्च १७३०) ढवळकें शहर लुटलें. पिलाजी जाधव यास मुक्त करून कोवळणांत फिरंगीयावर सवाल महिन्यांत (मे १७३०) पो. मांडवगड घेतल्याची खबर मल्हारजी होळकर व उदाजी पवार यांजकडून आली, छ १८ जमादिलाखर (२८ डिसेंबर १७२९) मु॥ मियाबाद. गुजराथचा सरबुलंदखान यानें दिल्ली बादशहाकडे बहुतप्रे॥ बोलणें लाविलें कीं मुलखाची हैराणगत झाली, वसूल येत नाही, तर द्रव्य देऊन माझें रक्षण करावें. परंतु बादशहानें कांहीं उत्तर दिलें नाही. आणि चिमाजी अप्पानीं लष्करसुध्दा पेटलादेस येऊन त्या शहरची खंडणी घेऊन ढवळकें लुटलें.