Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सु॥ इहिदे सलासीन मयाव अलफ, सव ११४०
फसली, अवल साल छ १८ जिल्काद, २५ मे
१७३०, ज्येष्ठ वद्य ५ शके १६५२.
छ २९ जिल्काद (६ मे १७३०) अवल साल जासूद दिम्मत पिलाजी जाधवराव कोहज किल्ला प्रे॥ कोंकण पे॥ सर केल्याचें वर्तमान घेऊन आला. जिल्हेज महिन्यांत (जून १७३०) अप्पासाहेब पायागडची स्वारी करून उंबरजेस गेले. महाराज तेथें गेले, भेट झाली. छ ३ मोहरम रोजीं (८ जुलै १७३०) पुन्हां चिमाजी अप्पा उंबरजेस गेले. छ ३ सफर रोजीं (६ आगष्ट १७३०) उंबरजेहून साता-यास बाजीराव बल्लाळ यांची स्वारी आली व छ ९ मिनहू रोजी (१२ आगष्ट १७३०) पुण्यास आले. छ ४ सफर रोजी (७ आगष्ट १७३० खबर चिमाजी अप्पास पुत्र जाला ह्मणोन आली. छ ११ रोजी (१४ आगष्ट १७३०) नामकर्ण ठेविलें. सदाशिवराव भाऊसाहेब याचा जन्म. छ २८ सफर रोजी (३१ आगष्ट १७३०) चिमाजी अप्पाची बायको बाळंत असता मयत झाली, नांव रखमाबाई. छ ११ रविलाखर (१३ अक्टोबर १७३०) बाजीराव साहेब याची स्वारी निघाली चिमाजी अप्पासुध्दां. पुढे छ ४ रमजान रोजीं (२ मार्च १७३१) बाजीराव अप्पाचे लष्करांत आलें. ही स्वारी गुजराथचे दाभाड्यावर झाली. ही स्वारी व्हावयाचें कारण निजामुन्मुलुकाचा व बाजीराव याचा तह होऊन भेट झाली असतांही त्याजला बाजीराव याणीं नाश केल्याचें स्मरत होतें. त्यानें आपलें अंग न दाखविता दुस-याकडून सूड उगविण्याचें मनात आलें. त्या कामाचे उपयोगीं त्र्यंबकराव दाभाड्या आहे असें वाटलें. त्याचें व बाजीराव याचें पहिलेंच वाकडें होतें. पुढें गुजराथची चौथ व सरदेशमुखी पेशवे यांस प्राप्त झाल्यावर तो फौज ठेवावयास लागला असोन ३५००० फौज जमा केली. व निजामाचेंही साहाय्य आपणांस मिळेल असें समजून दक्षिणेंत येण्यास सिध्द झाला, व लोकांत असेंही प्रसिध्द करूं लागला कीं, आमचा धनी मराठा याचें राज्य बाजीरावानें घेतलें, ते त्यास द्यावयास जातों. असे बोलून आपल्यास मदत पिलाजी गाइकवाड व कंठाजी, रघूजी कदम बांडे व उदाजी, व आनंदराव पवार व चिमाजी दामोदर वगैरे घेतले. हें वर्तमान पेशवे यास कळतांच तेही फौजेसहीत च ५ सवाल रोजी (२ मार्च १७३१) डभई मुक्कामी आलें. त्यावेळेस लढाईस आरंभ झाला. दमाजी गाईकवाड यानें बिनीवाला याशीं लढून त्याचा पराभव केला. नंतर पेशवे खुद्द चालून येऊन मोठें युध्द झालें. दाभाडे याची फौज मारून त्र्यंबकराव दाभाडे यास गोळी लागून ठार झालें. व मालोजी पवार ठार झालें. उदाजी पवार व चिमणाजी दामोदार पाडाव झाले. आनंदराव पवार व पिलाजी गाइकवाड व यशवंतराव व जावजी दाभाडे व कुवर बहादूर हे जखमी होऊन गेले. त्र्यंबकराव याचा मुडदा व पिलाजीचा थोरला लेक सयाजी गाइकवाड जखमी होऊन पाडाव होते, त्यांस पाठवून दिलें.