Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

आंग्रे याचा तह सालगुदस्त जाहाला. त्यांत कांही मुलूख आंग्र्यानें शाहूमहाराजास दिला. त्यांत आंग्र्याबरोबर कांही मुलूख शिद्यानें घेतला होता. तो शाहूकडे गेला. यामुळे आंग्र्याशी शिद्दी लढूं लागला. तेव्हां आंग्र्याचे कुमकेस बाळाजी विश्वनाथ जाऊन सिद्याशीं तह छ ५ सफर (३० जानेवारी १७१५) रोजी झाला. त्यांत असें ठरलें की, मामलत तळें व गोरेगांव, गोवेळ व निजामपूर इतके महालांवर आंग्रे यासी १००० रुपये मामल तळेपैकी व शाहूकडे मामले तळेपैकीं ८००, गोरेगावपैकीं ६००, गोवळेपैकीं १०००, तर्फ निजामपूरपैकी १७५, असे शाहूकडे २५७५ रुपये देणें. येणेप्रमाणें एकंदर ३५७५ रुपये मराठ्यांत पेस्तर सालपासून पोंचतील; व तर्फ नागोठणें व अष्टमी व पाली आश्रेधार पेटा व अंतोर्णे या महालांत दुतर्फे पाहणीदार फिरत जाऊन वसूल सुदामत निमेनिम होईल, वगैरे मजकूर तहांत आहे.

बाळाजी महादेव याजकडे फडणिशी दिली. हरि महादेव जेजूर मुक्कामीं मेले. मुलकास कौल दिला. अधिकभाद्रपद साबान महिन्यांत आला होता.

सु ॥ सीत अशर मया व अलफ, सन ११२५ फसली,
अव्वल साल छ ४ जमादिलाखर, २८ मे १७१५,
ज्येष्ठ शुध्द ६ शके १६३७.

परसोजी भोसले मयत झाले. त्यांचा सरंजाम व सेनासाहेब किताब त्यांचे पुत्र कान्होजी यांस देऊन कटक व वऱ्हाड व हिंदुस्थानपैकीं कांहीं भाग, महाल गोंडवण असा सुभा सांगितला. सेनापतिपद आपल्यास मिळालें नाही ह्मणून, हैबतराव निंबाळकर यांनी महाराजाशी कलह करून मोगलांकडे मिळून गोदावरीतीरी राहिले. पुढें त्यांचे सख्य झाले नाहीं. या वेळेस पुणें प्रांताचा अंमल मोगलांकडून बाजी कदम मुख्य अधिकारी होता. त्यानें निंबाळकरास उपद्रव करणार नाहीं, असे पेशवे याजकडून कबूल करवून नंतर पेशवे याचा पक्ष धरला. तेव्हा सर्व अमल पेशवे याचा बसला. हैबतराव निंबाळकर मेले. त्याचें पद सरलष्करचें आपल्यास मिळावें असें त्याचा पुत्र रंभाजी याचें ह्मणणे होतें. ते शाहू महाराज याणी कबूल केले नाहीं. सबब शाहूचा पक्ष टाकून मोगलाईत गेला. तिकडे रावरंभाजी असा किताब मिळून, मोठी योग्यता वाढून सरंजाम वगैरे मिळाला. तो अद्याप याचे वंशिकांकडे चालत आहे. सरलष्करपद निंबाळकराचें दावलजी सोमवंशी यास करार केले. पुरंदर किल्ला पेशवे यास अर्बा अशरांत पंतसचिव याणीं दिल्हा. त्यावर अंमल पेशवे यांचा अंबाजी त्र्यंबक पुरंधरे याणी बसवून सासवडास आले.

सु ॥ सवा अशय मया व अलफ, सन ११२६ फसली,
अव्वल साल छ १५ जमादिलाखर, २८ मे
१७१६, ज्येष्ठ वद्य १ शके १६३८.

६+

६+१