Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

त्यास गलबतांचा अधिकारी करून सरखेल पद कायम केले, आंग्रे यांनी पिंगळे यास सोडावें व राजमाची खेरीज शाहूचे किल्ले घेतले ते द्यावे, शाहू महाराजाचा पक्ष धरावा व संभाजीचा पक्ष धरू नये, असें ठरवून बाळाजी विश्वनाथ यांनी पिंगळे यांस आंग्रे याजकडून सोडवून आणिल्यावर त्यास बरोबर घेऊन साताऱ्यास आले. असाच एक बंड करणारा शंभू महादेवाचे डोंगराजवळ कृष्णराव खटावकर नामेकरून होता. त्याजला मोंगलाकडून राजा असा किताब होता. त्याचे पारिपत्यास बाळाजी विश्वनाथास पाठविलें व त्याचे मदतीस परशराम त्र्यंबक प्रतिनिधी याचा दुसरा मुलगा श्रीपतराव यास पाठविलें. त्याने खटावकर यास जिंकिले. या कामी त्याणी बहुत शौर्य केले, सबब महाराज प्रसन्न होऊन परशराम त्र्यंबक प्रतिनिधि कैदेंत होते, त्यांस मुक्त करून प्रतिनिधिपद वंशपरंपरेने दिलें. राजशक ४० जयनामसंवत्सरे वैशाख शु. ५, अर्बा अशर मया व अलफ, छ. ४ रबिलाखर, (८ एप्रिल १७१४) या दिवशीं प्रतिनिधीला सनद दिली. खटावकर यांस गांव वंशपरंपरेनें इनाम दिला. अशी मोठी कामें बाळाजी विश्वनाथ यांनी केली, हे यशस्वी व फौजेचे व मुत्सद्दीपणाचे कामायोग्य, मर्द माणूस, सबब बहिरोपंत पिंगळे यांजकडील पेशवेपद दूर करून छ ९ जिलकादे, अर्वा अशर मया व अलफ सालीं (१६ नोव्हेंबर १७१३) बाळाजी विश्वनाथांस मौजे मांजरी, प्रांत पुणें या मुक्कामी पेशवेपद दिलें. इतमाम साहेबनौबत, जरीपटका, बादली, पांच सनगें, जवाहीरकंठी, ढालतलवार, शिक्के कटार, असा शके १६३५ साली दिला. खानदेश, माळवा व बागलाण सुभा सांगितला. पुढें हिंदुस्थानचा अंमल साधेल तो व गंगातीरीं मोंगलाईंतील सुभा दिला. कर्नाटक, चंदीचंदावर, त्रिचनापल्ली अंल गेला, तो बसवावा. संस्थानिकांकडून खंडण्या येत ना त्या घ्याव्या. नौबतखाना महाराज असतील त्या मुलुखापासून दहा कोस आंत बंद असावा, ह्मणजे वाजवूं नये. शिवाय पेशवेपदास सरंजाम महाल वगैरे दिले. बाळाजी विश्वनाथ यांनी आपल्या बरोबर रोजगाराकरितां सोबतीस आणिलेले अंबाजी त्र्यंबक पुरंधरे यांस आपली मुतालिकी, व रामाजीपंत भानू यांस फडनिशी अशी महाराजास विनंति करून देवविली. बाळाजी विश्वनाथ पेशवे झाले, त्या वेळेस अष्टप्रधान होते ते :- १ प्रतिनिधी, परशराम त्र्यंबक, २ अमात्य, अंबूराव बापू हणमंत्ये, ३ सचिव, नारो शंकर, ४ मंत्री, नारोराम शेणवी, ५ सेनापति, मानसिंग मोरे, ६ सुमंत, आनंदराव, ७ न्यायाधीश, होनो अनंत, ८ पंडितराव, मुद्गलभट उपाध्ये व ९ पेशवे, बाळाजी विश्वनाथ. पुणे सुभ्यांत पेशवे यांचा अमल झाला. पेशवे यांजकडील अंमलास व्यंकोजी ढमढेरे पुण्यास आले; रंभाजीराव निंबाळकर यांजकडील बाजी कदम, याप्रमाणें पुण्यांत दोन अंमल झालें. पुणें प्रांत मोंगलाकडून जहागिरी रंभाजी निंबाळकर याजकडे होता. शके मजकुरीं पेशवे यांचा अंमल बसला तो स्वराज्यापुरता बसला. किल्ले लोहोगडची सबनिशी रामाजी महादेव भानू याजकडे व नाणे मावळची मजमू हरी महादेव याजकडे पेशवे यांनी सांगितली. त्या कामावर भिकाजी नारायण व अंताजी नारायण परचुरे होते.