Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
प्रतिनिधीस महाराजाकडून प्रतिनिधिपद दिल्याबद्दल राजाची सनद झाली ती अशी :- स्वतिश्री राज्याभिषेक शक ४० विजयनाम संवत्सरे वैशाख शु. ५ गुरुवासर क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहू ५ छत्रपति स्वामी याणीं समस्त राजकार्यधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री परशराम त्र्यंबक प्रतिनिधी यांसी आज्ञा केली ऐंसीजे:- तुह्मी स्वामी सन्निध विनंति केली ती तीर्थस्वरूप महाराज राजाराम काकासाहेब कैलासवासी यांचे कारकीर्दीत राज्यांत बहुत श्रमसाहस केले. यास्तव प्रतिनिधिपद अजरामरामत वतनी आपणास करून दिल्हें आहे ते पत्र पाहून नवीन पत्र करून द्यावें ह्मणोन. त्याजवरून ते पत्र पाहून मनास आणितां पूर्वी राज्यावर औरंगझेब बादशाहा दक्षिणेंत येऊन सातारा, परळी व विशाळगड, पन्हाळा या किल्ल्यांस वेढा घालून बसले. ते समयीं तुह्मी झुंझण्याची शर्त केली. आणि पुन्हा बादशाहा माघारा फिरतांच श्रम जातीनिशी करून किल्ले घेतले. चंदीस महाराज गेले होते. तेथे धन्याचे साहित्याची सीमा केली. तेथून साहेब देशीं आल्यावर राज्य स्वाधीन केले आणि आज्ञेप्रमाणें वर्तून एकनिष्ठपणें सेवा केली. अशी महत्कार्ये करून राज्यरक्षण केलें. यास्तव तुह्मावर कृपाळू होऊन प्रतिनिधीचें पद तुह्मास वंशपरंपरेने वतीन करून दिल्हे असे. भोसले यांचे राज्याचे वंशी जो राज्य करील त्यानें तुमचे वंशाचे ठायी ममतापुरस्सर विश्वास ठेवून वंशी पद चालवावें. यासी अंतर करील त्याचे राज्यास श्रेयस्कर होणार नाही. छ. ४ रविलाखर सु.॥ अर्बा.
पंडितराव श्रीकराचार्य आईसाहेबाकडे गेले, सबब हे पद मुद्गलभट यांस दिलें. मंत्रीपद रामचंद्रपंत पुंडे याजकडून काढून नारोराम याजकडे सांगितले. न्यायाधीशपद शिवो विठ्ठल याजकडून काढून होनो अनंत याजकडे सांगितलें. सुमंतपद महादाजी गंगाधर हणमंते याजकडून दूर करून आनंदराव वकीलीस योग्य सबब आनंदरावाकडे सांगितले. सरलष्करपद हैबतराव निंबाळकर याजकडून काढून दावळजी सोमवंशी याजकडे करार केले. पारसनीस बुवाजी नीळकंठ होते, ते आईसाहेबाकडे गेले, सबब यादव बाळाजी परभू याजकडे सांगितलें. पुढें त्यास दिल्लीस सय्यदाकडें वकिलीस पाठविलें. तोफखान्याचे दरोगे नागोराव मेघश्याम नेमिले, व त्याजकडे राजाज्ञांची मुतालिकी सांगितली. पंतसचिव यांजकडे स्वदेशसुभा व कांही कोकणचे महाल दिले. व जो सरंजाम दिल्हा तो खाऊन महाराज याजकडील पीलखान्याचा खर्च चालवीत जावा असें ठरविले.
सु॥ खमस अशर मया व अलफ, सन ११२४ फसली,
अव्वल साल छ २३ जमादिलावल २६, में
१७१४, ज्येष्ठ वद्य ९ शके १६३६.
५+
५+१
५+२
५+३
५+४