Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अकरावा ( १६९१-१७६०)
लेखांक ५८.
श्री.
१६६९ पौष शुध्द ३. आज्ञापत्र समस्तराजकार्यधुरंधर विश्र्वासनिधी राजमान्य राजश्री बाळाजी पंडित प्रधान ता मोकदम मौजे केळगाव ता चाकण प्रा जुन्नर सु|| समान अर्बैन मया व अलफ. मौजेमजकुर बाबतीचा मुकासा श्रीपांडुरंगाश्रम परमहंस वास्तव्य क्षेत्र आळंदी यांस तीर्थरूप कैलासवासी राव यांनी दिल्हा आहे. त्याप्र|| करार असे. तरी तुम्ही परमहंसस्वामीकडे रुजू राहोन मौजेमजकुरच्या आकाराप्रमाणे बाबतीचा ऐवज वसूल यांजकडे साल दरसाल देत जाणे. दरसाल ताजे सनदेचा उजूर न करणे. तीर्थरूप कैलासवासी यांचे पत्राप्रमाणे चालविणे. जाणिजे. छ २ मोहरम. आज्ञाप्रमाण.
लेखांक ५९.
अलीफ.
१६७२ भाद्रपद शुध्द १२. अबदुल अजीजखा बहादूर
ता मोकदमानी मौजे केळगांव सुहुरसनहजार ११५१ बीदानद के- मौजेमजकुर नबाब यांनी श्रीस्वामीच्या पूजेवर द्रिष्टि देऊन नजर केला आहे; आणि तुम्ही अजराह हरामजादगी स्वामीच्या पारपत्यकारांसी रुजू न होऊन मोरोपंतांसी रुजू होतां; व माल वाजवी आदा करीत नाही; म्हणोन ऐकिले. हे गोष्ट बहुत बेहिसाब असे. ताकीद तमाम समजोन स्वामीच्या पारपत्यगाराच्या सेवेसी सरळ असोन माल वाजवी आदा करीत जाणे. नोदीगर केलिया मुलाहिजा होणार नाही. मारले जाल. ताकीद जाणिजे. रा छ ११ माहे शबाल. मोर्तब सूद.