Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक ६०.
श्री.
१६७३ कार्तिक वद्य ७.
अखंडित –लक्ष्मी-अलंकृत-राजमान्य राजश्री हरि दामोदर गोसावी यांसी-

सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार सु इसन्ने खमसैन मया व अलफ. मौजे केळगांव, ता. चाकण. प्रा. जुन्नर, हा गाव श्रीपांडुरंगाश्रम स्वामी यांस पहिल्यापासून आहे. त्यास, दाभाड्याची सरदेशमुखी व सरपाटीलकीचे रोखे तुम्ही मौजे मजकुरावर केले आहेत. म्हणोन हुजूर विदित जाहले. ऐशास, मौजेमजकूर स्वामीकडे पहिल्यापासून चालत आला आहे. तरी सरदेशमुखी व सरपाटीलकी मौजे मजकुरची तुम्ही जप्त केली आहे ती साल मजकूरपासून मोकळी केली असे. तरी मौजेमजकूरचा अंमल सुदामनप्रो स्वामीकडे देववणे. सरदेशमुखी व सरपाटीलकी सालाबादप्रो यांजकडे चालवणे. दाभाडियाचे अंमलात चालल्याप्रो पुढे चालवणे. त्यांत नोदिगर न करणे. जाणिजे. छ २० जिल्हेज. *   बहुत काय लिहिणेॽ
(लेखनसीमा. बार)

लेखांक ६१.
श्री.
१६७४ भाद्रपद शुध्द ७. राजमान्य राजश्री गोपाळ भास्कर गोसावी यांसी-

सेवक बाळाजी बाजीराऊ प्रधान नमस्कार. सु सलास खमसैन मया व अलफ. मौजे केळगाऊ ता चाकण हा गाव स्वराज्य व मोगलाईतून इनाम श्रीपांडुरंगाश्रम परमहंस यांजकडे आहे. त्यास साल गुदस्ता वसूल यांस पावला नाही, म्हणोन हुजर विदित जाहले. त्यावरून हे पत्र सादर केले असे. तरी, तुम्ही मौजेमजकुरास ताकीद करून सालगुदस्तांचा वसूल राहिला आहे तो देववणे व पुढे तुम्ही मौजेमजकुरापासोन इनामाचा पैका सालाबादप्रमाणे वसूल करून श्रीकडे देत जाणे. छ ५ जिलकाद.