Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अकरावा ( १६९१-१७६०)
लेखांक ५०.
श्री.
१६६७ फाल्गुन वद्य ११. श्रीमत् पाडुरंगस्वामीचे सेवेसी-
चरणरज बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहिणे. विशेष. तुम्ही पत्र पाठविले ते प्रविष्ट जाहाले. मौजे केळगांव आपल्याकडे दरोबस्त स्वराज्य व मोगलाई आहे, त्यास प्रस्तुत चाकणचे किल्लेदार मोगलाईचा अंमल घेणार, प्यादे पाठविले आहेत, तरी ताकीद केली पाहिजे, म्हणून लिहिले. त्याजवरून येविशींची तहकीकात करून लेहून विसाजी गोविंद हवलदार ता|| खेडचाकण याजकडून आणविले आहे. ते आले म्हणजे जे कर्तव्य आहे ते केले जाईल. कळले पाहिजे. छ २४ सफर. बहुत काय लिहिणेॽ हे विनंति.
लेखांक ५१.
श्री.
श्रीमत् श्रीपांडुरंगाश्रम परमहंस स्वामीचे सेवेसी-
चरणरज सदाशिव चिमणाजी कृतानेक उपरि येथील कुशल लिहित जावे. विशेष. आपण पत्र पाठविले ते प्रविष्ट. केळगांवाविशी मनाचिठी मागितली. त्यास, त्याजवरून मनाचिठी सादर केली असे. गांवमजकुरास उपसर्ग लागणार नाही. * बहुत काय लिहिणेॽ हे विनंति.