Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक ६५.
श्री.
१६९७ आश्र्विन शुध्द २ राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री निलकंठराव रामचंद्र स्वामी गोसावी यांसी-

पो माधवराव नारायण प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत जाणे. विशेष. मोरोबो मोझे गोसावी यांणी हुजूर विदित केले की- श्री पांडुरंगाश्रमस्वामी श्रीज्ञानेश्वरचे आळंदीचे नजीक केळगाव येथील रानात गोपालपूरची वस्ती करून श्रीच्या मूर्ती स्थापन करून देवालय करून, उत्साह गोपाळकाला करीत होते. यास्तव केळगांव संस्थानास इनाम दिल्हे. त्यास पांडुरंगाश्रमस्वामीचा व आपले तीर्थरूप मोरोबा गोसावी यांचा बहुत स्नेह. आपले तीर्थरूप ईश्र्वरभक्त, सबब केळगाव संस्थानाकडे जाहल्यापासोन, स्वामी आपले बापाचा संसार व पंढरपूरचे यात्रेचा खर्च व यात्रेचा जाताना राबता माहार व बेगारी व केळगावी बेट आहे त्याजपो गवताचा दररोज भारा येक व कांही लांकडे याप्रो, चालवीत होते. स्वामी समाधिस्थ जाहल्यावर कृष्णराव चासकर स्वामीचे सिष्य हे थोडेबहुत चालवीत होते. अलीकडे स्वामीचे पूर्वाश्रमीचे पुत्र व गोपालभट यांणी सरकारांत समजाऊन कांही संस्थानास खर्चाची नेमणूक व काही असामी यांची नेमणूक करून घेतली. आमची नेमणूक करून घेतली नाही. त्यास, आमचे तीर्थरूपांचे स्वामींनी चालविले आहे, हे सर्वांस दाखल आहे. आपण श्रीपासी आळंदीस व गोपालपुरी सेवाकीर्तन येकादशीस जाग्रण करीत आहो. पंढरीचे यात्रेस जातो. यास्तव, केळगावच्या अलीकडे नेमणुकी करून दिल्या आहेत, तापो बकुबाई यांची पंचवीस रुपयांची असामी आहे ती मृत्य पावली, त्यांचे नक्कल जाहाले. सबब ते पंचवीस रुपये व वरकड असाम्यांची नेमणूक आहे त्याजपो पंचवीस रुपये येकूण पन्नास रुपये व पंढरीचे यात्रेचा राबता माहार व बेगारी व बेटापो गवताचा भारा येक दररोज व लांकडे यांप्रो देववणे. म्हणून त्यावरून. हे पत्र सादर केले असे. तरी नारोबा मोझे याचे पांडुरंगाश्रम चालवीत होते. त्यास नारोबाचे पुत्र मोरोबा परमईश्र्वरभक्त यांची नेमणूक पहिल्या करारांत करून घेतली नाही. सबब कुरणपों दररोज गवताचा भारा हंगामशीर व बेगारी पंढरीचे यात्रेस जावयास पूर्ववत व पन्नास रुपये दरसाल येणेप्रो देविले असे. तरी पंचवीस रुपये बकूबाईचे नक्कल जाहाले ते व साज्या असामीचे कमी करून केळगावप्रो पंचवीस येकूण पन्नास रुपये व बेटांतील गवताचा भारा दररोज येक व राबता माहार व बेगारी गावपो या प्रो देत जाणे. या पत्राची प्रत लेहून घेऊन, हे अस्सल पत्र मोरो बिन नारो बाबा मोझे याजवळ भोगवटियास परतोन देणे. जाणिजे. छ ३० रजब, सु|| सीत सबैन मया व अलफ. बहुत * काय लिहिणे. हे विनंति.
बार.

मंगळवेढची हकीकत.
(हा हकीकतनामा मंगळवेढ्यास मिळाला. ह्यांत दुर्गादेवीच्या दुष्काळापासून सवाईमाधवरावाच्या मृत्यूपर्यंतची हकीकत आली आहे. मूळ लेखकाने हकीकतीचे सहा भाग केले आहेत. मराठेशाहीत जागजागीचे स्थानिक इतिहास लिहून ठेवण्याची चाल होती. मंगळवेढ्यास ज्या ज्या कारकीर्दी झाल्या, त्यांची त्यांची मंगळवेढ्याला अनुलक्षून प्रस्तुत हकीकत लिहिली आहे.)