Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक ४८.
श्री.

१६६२ पौष शुध्द १२. श्रीपराशरचरणी तत्पर रंभाजीसुत जानोजी निंबाळकर.
तां|| मोकदमानी मौजे केळगांव प्रां|| चाकण. सु|| सन हजार ११४१ आकीः मौजेम||र श्रीच्या संस्थानास दोन्ही राज्यांतून इनाम आहे. तर तुम्ही संवस्थानासी रुजूं राहून करारवजा चालणे. दुसरियाचा आजार लागणार नाही. स्वामींच्या आज्ञेस तफावत केलियां मुलाहिजा होणार नाही. जाणिजे. छ १० सवाल.
मोर्तबसूद.


लेखांक ४९.
श्री.

१६६५ आश्र्विन शुध्द ७. चिरंजीव राजमान्य राजश्री सदाशिव चिमणाजी यास बाळाजी बाजीराव प्रधान आशीर्वाद सु|| अर्बा खमसैन मया व अलफ. मौजे केळगांव ता|| चाकण प्रांत जुन्नर या गांवास मोगलाई अमलाचे वसुलाकरितां तगादा लाविला आहे, म्हणोन हुजूर विदित जाहाले. तर मौजेमजकुरास खासा स्वारी पुणेयास येईतोपर्यंत वसुलाचा तगादा न लावणे. पेस्तर खासास्वारी पुणियास आल्यावर आज्ञा होईल त्याप्रमाणे वर्तणूक करणेयं. जाणिजे. छ ६ साबान.
(लेखनसीमा)