Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अकरावा ( १६९१-१७६०)
लेखांक ५४.
श्री.
श्रीमत् परमहंस पांडुरंग स्वामीचे सेवेसी-
सेवक चिमणाजी बल्लाळ साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत गेले पाहिजे. विशेष. राजश्री मल्हार बल्लाळ खिजमतराऊ आले. यांनी आपल्या गावाविसी सांगितले. त्याजवरून गावचे कुणबी येथे आले होते. त्यास गावास जावयास आज्ञा दिल्ही असे. खरिदीच्या कडब्याचा तगादा लागणार नाही. * हे विनंति.
लेखांक ५५.
श्री.
१६६८ चैत्र वद्य ११. राजमान्य राजश्री विसाजी गोविंद हवालदार त|| खेड व चाकण यांसी-
बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार. सु|| सीत अर्बैन मया व अलफ. श्री पांडुरंगस्वामी यांजकडे मौजे केळगांव ता चाकण हा गाव दराबस्त स्वराज्य व मोगलाई याजकडे चालत आल आहे. त्यास, प्रस्तुत चाकणचे किल्लेदाराने मोगाईच्या अमलास्तव प्यादे मौजे मजकुरी पाठविले आहेत, म्हणोन वर्तमान कळले. ऐशियास, इतके दिवस गोसावी याजकडे मोगलाई चालली, प्रस्तुत कां चालत नाही, हे कळले पाहिजे. तरी मौजेमजकूर स्वराज्य किती दिवस याजकडे चालत आहे व मोगलाई कोणत्या मोगलाने यास दिल्ही, सविस्तर लिहिणे. जाणिजे. छ २४. किती दिवस चालली व पुढे काय सबब किल्लेदाराने अंमल बंद केली आहे ते. छ १३ रबिलोवल. आज्ञाप्रमाण.
(लेखनसीमा)