Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक ५२.
श्री.
तीर्थरूप राजश्री पांडुरंगस्वामी वडिलांचे सेवेसी-

अपत्य कृष्णराव माहादेव स|| नमस्कार विनंति येथील कुशल माघ सुध द्वितीया रविवार मुकाम सातारा जाणून स्वकीय कुशल लिहिणे. विशेष. तुम्ही पत्र पाठविले ते पावले. गावास श्रीमंत याजकडील गाईचा म्हशीचा रोखा झाला आहे व किते(क) उपसर्ग गावास लागतो, म्हणोन लिहिले. त्यावरून श्रीमत् राजश्री पंतप्रधान यांची ताकीदपत्रे राजश्री रामचंद्र गोविंद यांसी व राजश्री भुलोजी ढमढेरे येकूण दोन पत्रे पाठविली आहेत. आम्ही श्रीयात्रेस मातुश्री ताईसमागमे जातो. तुम्ही आपली यात्रेस जावयाची सिध्दता करावी. * बहुत काय लिहिणेॽ लोभ असो दीजे, हे विनंति.


लेखांक ५३.
श्री.
हरिभक्तपरायण पांडुरंगस्वामी स्वामीचे सेवेसी-

सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल लेखन करणे. विशेष. मौजे केळगांव येथील पाटील येथे आले आहेत. त्याणी कित्येक आपले हकीकत विदित केली. त्याचा निकाल करणे लागते. याजकरिता तुम्ही आपल्याकडील कारभारी पाठऊन देणे. १७ रजब. बहुत काय लिहिणेॽ हे * विनंति.