Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक ६२.
श्रीराम.
१६७४ कार्तिक शुध्द १५. राजश्री नानाजी विठ्ठल कमावीसदार सरदेशमुखी तो चाकण, गोसावी यांसी-

स्नो येशवंतराऊ दाभाडे सेनापती दंडवत. सु सलास खमसैन मया व अलफ. मौजे केळगाऊ ता चाकण येथील सरदेशमुखीचा ऐवज श्रीच्या नैवेद्यास व तेलाबद्दल श्रीपांडुरंगस्वामी यांजकडे पेशजीपासून चालत आहे. त्याप्रमाणे सालमजकुरी करार करून दिल्हा असे. मौजेमजकुरचा ऐवज यांजकडे देत जाणे. जाणिजे. रा छ १४, * माहे मोहरम.
(मोर्तब सूद)



लेखांक ६३.
श्री.
१६७६ आषाढ वद्य १० श्रीराजा शाहु नरपति हर्षनिधान बाळाजी बाजीराव प्रधान.

मा अनाम चंदरराव देशमुख व सदाशिव विश्र्वनाथ देशपांडे, पा अकोले, यासी बाळाजी बाजीराव प्रधान सु इसन्ने खमसैन मया व अलफ. मौजे थुगांव खुर्द, पा मजकूर, येथील मोकदमी राजश्री कृष्णराव माहदेव यांची आहे. त्याचा महजर करून देतां तो अद्याप दिल्हा नाही. ऐसे असतां मारनिल्हेचा गुमास्ता व रुद्राजी पाटील याचा लेक धरून नेऊन मोगलाचे कैदेत ठेविला आहे. म्हणोन हुजूर मानिल्हेंनी विदित केले. तरी, मारनिल्हेचा गुमास्ता व पाटलाचा लेक मोगलाचे कैदेत ठेवाया गरज कायॽ हाली हे आज्ञापत्र सादर केले असे. तरी, गुमास्ता व पाटलाचा लेक या दोघांस सोडून देणे आणि तुम्ही हुजूर येणे. येक घडीचा दिरंग न लावणे. उजूर केलिया मुलाहिजा होणार नाही. या कामास सेख ढालाईत पाठविला असे. यास मसाला रुपये देशमुखाकडून रु|| २५ व देशपांडे मार रु|| २० ऐकूण रुपये पंचेताळीस देविले असत. आदा करणे. जाणीजे. छ २४ शाबान. आज्ञाप्रमाण.
(लेखनसीमा.)