Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक ४४.
श्री.
ब्रह्मरूपस्वामी वास्तव्य क्षेत्र आळंदी स्वामीचे सेवेसी-

सेवक राउ जानोजी निंबाळकर करद्वय जोडून सां|| दंडवत विनंति विज्ञापना जे – स्वामींच्या कृपावलोकनेकरून येथील कल्याण जाणोन निजानंद आशीर्वादपत्री लेखन करून सांभाळ केला पाहिजे. बहुत दिवस जाले, आशीर्वादपत्र येत नाही. याजकरितां चित्त सापेक्षित आहे. तर निरंतर आशीर्वादपत्री आनंदवीत असले पाहिजे. बहुत काय लिहिणेॽ कृपा अखंडित करीत आहांत त्याची वृध्दि संपादिली पाहिजे. बहुत काय विज्ञप्तिॽ


लेखांक ४५.
|| श्री पांडुरंग समर्थ ||
|| श्रीपांडुरंगाश्रम ||

श्रीमत्सज्जनमनरंजन भगवज्जनयोगीज नहुतभवजनपरिश्रम स्वामींचे सेवेसी – किंकर जानोजी निंबाळकर करद्वय जोडून सां|| दंडवत विनंति उपर. येथील क्षेमप्रताप स्वामीचा जाणून सांभाळपत्र कृपातपत्री सताळ व सनाथ कीजे. विशेष दिवस अलंकापुरीस अलंकार करून स्वामी राहिले. सेवकजनाचे स्मरण असोन विस्मरण अंगीकारिले. सांप्रत परामृशाभिवृध्दि केली पाहिजे. विद्वज्जनमनमणिगण मुगटमणिश्रीहरि गुरुचरणी लीन राजश्री *  सीवदिनबाबा त्या प्रांतात शोभा द्यावयास व स्वामीचे दर्शन घ्यावयास आले आहेत. भेटीनंतर अंतरांतर साक्षपणेही साकल्य सच्चिदानंद अवगत होईल. विशेष लिहिणेॽ विनंति.