Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अकरावा ( १६९१-१७६०)
लेखांक ४०.
श्री.
श्रीमत् – परमहंस-परमपद-परात्पर-गुरुमूर्तिमहाराज राजश्री स्वामींच सेवेसी-
विनंति चरणरज मल्हार बल्लाळ खिजमतराव करद्वये जोडून सां|| विज्ञापना जे- महाराजांनी कृपावंत होऊन रा मलबास केळगांवीच्या साहित्यपत्राविषई आज्ञा केली. आज्ञेप्रमाणे * जीर्णपुरींतून पत्रे आणून सेवेसी पाठविली आणि सांप्रत रा नरसिंहपंत तात्या व त्यांचे पुतणे रा हरिपंत यासी पत्रे पाठविली आहेत. कृपा करून चाकणेस पावती करावी. अतःपर उपसर्ग लागणार नाही. सदैव आशीर्वादपत्री सांभाळ करणे. आपण दासानुदास असो. बहुत काय लिहिणेॽ कृपा अखंडित अस दीजे. हे विनंति.
लेखांक ४१.
श्री.
श्रीमदखल-शमदमादि-गुणगण-मणिमाला-विराजित-निरंतराराधि तेश्र्वर-राजश्री ज्ञानेश्र्वर स्वामी.-
* सेवक माहाराऊ जानोजी निंबाळकर दंडवत विनंति. उपर. येथील क्षेम श्रीकृपेकरून व स्वामींच्या आशीर्वादेकरून जाणोन, स्वात्मसुखानंदलेखने क्षणक्षणी कृपावीक्षणे सेवकास त्या लक्षणे लक्षिले पाहिजे. आसीरवाद पत्र पाठविले, पावले. मौजे केळगांवास नवा इजारदार फार उपसर्ग प्रकार करितो, हे वर्तमान जुन्नरकर यांसी लौकर लेहून त्यांची ताकीद-पत्रे आणवावी; हे सबब लेख केला. आज्ञेप्रमाणे जुन्नरकरास लिहिणे ते लिहिले आहे. उत्तर येईल ते पाठविले जाईल. बहुत काय लिहिणेॽ कृपा पूर्ण वर्धमान कीजे. हे विनंति.