Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक ३६.
श्रीराम.

१६६१ कार्तिक वद्य २. राजश्री सुभानजी बेरगे गोसावी यांसी- अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य प्रति उमाबाई दाभाडे. सु|| अर्बैन मया अलफ. मौजे केळगांव प्रांत चाकण हा गांव माहाराज श्रीस्वामीकडे इनाम देखील सरदेशमुखी दिल्हा असता, तुम्हांकडील नागोजी मळेकर गांवास वेठबिगार वगैरे उपद्रव करितो, म्हणून विदित जाले. हे गोष्ट उचित नाही. याजउपरी त्यास ताकीद करून श्रीचिया गांवास एक जरा उपसर्ग न देणे. जाणिजे. छ १५ साबान.


लेखांक ३७.
श्री.

किलेदार चाकणे यांजला ताकीदपत्र सैदलस्करखान यांचे घेतले आहे ऐसे जे- मौजे केळगांव यांस दरबख्त मुजाहीम काय सबब होत असताॽ याजपाशी सनद अबदुल अजीजखान याची आहे. सुदामतप्रमाणे याजकडे चालत आले आहे. त्याप्रमाणे मोकासबाब घेतील. तुम्ही मौजेमजकूरचे वाटेस दरगाह न जाणे. ऐसे पारसी सैदलस्करखानाचे किलेदारास लखोटा घेतला असे.