Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक ३८.
श्री.
श्रीहरिचरणांबुजनिरत श्रीपांडुरंगस्वामी चरणारविंदेषु-

विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान साष्टांग नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल श्रीकृपे यथास्थित असे. विशेष. स्वामींचे चरण पाहावे, हे अपेक्षा बहुत आहे. तरी स्वामींनी दर्शनाचा लाभ दिल्हा पाहिजे. * हे विनंति.


लेखांक ३९.
श्री.
श्रीसकलतीर्थांच माहेर ब्रहमरूपमहाराज राजश्री स्वामीच शेवेसी-

चरणरजरेणु मल्हार बल्लाळ खिजमतराव सां|| विज्ञापना जेः कृपावलोकने स्वामीच्या कल्याण असे. कृपा करून आशीर्वादपत्री सांभाळ केला तेणेकरून पावनता जाली. राजश्री गोपाळपंताच्या पत्राचे प्रत्योत्तर पाठविले ते पाहून समाधान पावलो. परतोन सेवेसी ते पत्र पाठविले आहे. सदैव आशीर्वादपत्री सांभाळ करीत असावा. हे विज्ञप्ति.