Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अकरावा ( १६९१-१७६०)
लेखांक ३४.
श्री.
१६५७ आश्र्विन शुध्द ५. चिरंजीव राजमान्य राजश्री बाळाजी बाजीराव यांसी- बाजीराव बल्लाळ. प्रधान आशिर्वाद सु|| सीत सलासैन मया व अलफ. मौजे केळगांऊ पा चाकण हा गांव श्रीपांडुरंगाश्रम याकडे आहे. त्यावरि मिरासपट्टीचा रोखा जाहला असे. तो मना करून, हे पत्र तुम्हांस सादर केले आहे. तरी तुम्ही मनारोखा देऊन मौजे मजकुरास उपद्रव न लागे ते करणे. जाणिजे. छ ३ जमादिलावल. * बहुत काय लिहिणेॽ
लेखांक ३५.
श्री.
१६५७ पौष शुध्द १२.
श्री.
* श्रीराजाशाहुचरणीत्पर बाळाजी बाजीराव निरंतर.
आज्ञापत्र राजश्री बाळाजी बाजीराव ता मोकदम मौजे केळगांव ता चाकण प्रां. मजकूर सु|| सीत सलासैन मया अलफ. मौजे मजकूरची वेठबेगार कुल माफ केली असे. तरी तुम्ही श्रीस्वामीचे पायासी एकनिष्ठ वर्तत जाणे. तुम्हांस काडी इतका आजार लागणार नाही. आपला खातीरजमा राखोन सुखरूप राहणे. जाणिजे. रा छ ११ माहे शाबान.
लेखनसीमा.