Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

१ श्रावण वद्य ३ तृतीयेस वेदशास्त्रसंपन्न शास्त्रीबाबांनी हरी सिध्देश्र्वर यांस बोलावणे पाठविले. त्यावरून सायंकाळी बाबांचे घरी मशारनिले गेले. नमस्कार करून बसले. तेव्हा बाबांनी रा त्रिंबकपंतास सांगितले की, हरीपंतासी आधी बोलावे, मग दुसरे काम करावे. त्याजवर आपणच म्हणाले की, तुम्ही बोलू नका, आम्ही बोलतो. त्यास आपणास बाबा म्हणो लागले की, आम्ही तुमची पत्रे पाहिली. त्याजवर मेघश्यामपंताशी आपले घरी दोन वेळ बोलणे चार चार घटका बोललो, त्रिंबकपंतही त्यांसी व त्यांचे बोलणे घेऊन आम्हांसी बहुत बोलले, याउपरी बोलावयाची गोष्ट राहिली नाही, मेघश्यामपंताचे बोलणे हेच की, आपण अस्सल पत्रे आणून पहावी, आपली निशा पत्राविशी पटली म्हणजे माझा गुंता नाही, आपल्यासी बोलतो हाच मुचलका आहे. ऐसे बोलले. त्याजवर विनंति केली की, पेशजी आपणास आम्ही मुचलका घ्यावयासी विनंति केली, आपण मान्य तीन वेळ केले, मुचलका घेऊन नंतर तुम्हांसी बोलू, त्याप्रमाणे करावे. त्याजवर मागती म्हणो लागले की, तुम्ही वसवसा न धरणे, अस्सल पत्रे आणावी आम्हांस मातुश्रीसी गैरवाजवी सांगावयाचे नाही, वाजवीच असेल त्याप्रो सांगू, मातुश्रीचा जीव आहे तोच दिम्मत आली तिचे निराकरण लावावे, पुढे चिरंजीवास कठिण पडेल, माहितगारी नाही, त्यास पत्रे घेऊन जरूर यावे आणि आम्हांस मात्र दाखवावी, आमची निशा पटली म्हणजे कदाचित वाद्या सरकारांत उभा राहिला तरी चिंता नाही, आम्ही आपली निशा करून घेतली ऐसे सांगू. याप्रमाणे रा त्रिंबकपंत व विठ्ठलपंत व आणखी मंडळी तेथे होती तीही बोलिली की, पत्रे आणून बाबांची खातरजमा करावी, चिंता नाही. ते समयी आपण बाबांस सांगितले की, मातुश्रींचेही म्हणणे हेच की, बाबा सत्यवादी आहेत, त्यांजजवळ पत्रेहि पाठवू, परंतु सरकारांत नकला खोट्या पाठविल्या असे वाद्या म्हणतो, त्याचा मुचलका घ्यावा आणि पारपत्य करावे. त्यास मागती असे सांगितले की, मुचलका नलगे, सहजच पत्रे नकलांप्रमाणे असली म्हणजे गुंता नाही. ते समयी त्रिंबकपंत बोलिले की, पत्रे दाखवून फडच्या करून घ्यावा आणि एक पत्र बाबांचे करून घ्यावे म्हणजे पुढे गुंता पडणार नाही. ते समयी बाबा बोलिले की, पत्र करून देऊ. ऐसे त्या दिवशी सायंकाळी जाले. मग उठोन घरास आलो. उपरांतिक हे वर्तमान वेदमूर्ती भटजीस सांगितले. भटजींनी मागती त्रिंबकपंतास सांगितले की, पत्रे आणावयाची आज्ञा जाली आहे, त्यास आमची व बाबाची एक वेळ भेट होऊन समक्ष पुसो, नंतर पत्रे आणावयासी हरिपंतास पाठवू, आम्हाजवळ मातुश्रीस पत्र हरिपंत मागतात, आम्ही समक्ष बोलणे जाल्याशिवाय पत्र देणार नाही. त्यास आठदहा दिवस जाले. बाबांची गाठ पडली नाही. तो भाद्रपद शुध्द प्रतिपदेस वाड्यांत श्रीचा उछाह होता, तेथे बाबांची व भटजी देवांपुढे गाठ पडली. भटजींनी बाबांस सांगितले की आपण चासकराचे प्रकरणाविशी मुचलका घेऊन पुढे पत्रे आणवू. ऐसे ठरविले होते, हाली हरिपंत आम्हाजवळ पत्र मागतात की मुचलका बाबा घेत नाहीत, पत्रे आणावी म्हणोन आज्ञा केली, त्यास हे काय, वारंवार तह ठरतो आणि मोडतो, याचा विचार कायॽ त्याजवर भटजींचे व बाबांचे बोलणे बहुत झाले. तेव्हा बाबांनी निशापूर्वक सांगितले की, चिता नाही, तुम्ही आपले पत्र देणे, यांचे पाहून तुमचे हवाली करू, तुमचे समक्षच पाहू, कदाचित राजद्वार म्हणून मनामध्ये संशय धराल तरी न धरावा, तुमची पत्रे नकलांशी रुजू घालून तुमचे हवाली करू, यासी अन्यथा करू तरी आपल्यास गुरूची शपथ असे. ऐसे देवाचे दिवाणखानियांत बोलले. नंतर भटजींनी मान्य केले आणि आपले पत्र देऊन चासेस हरिपंतास पत्रे अस्सल आणावयासी पाठविले की, पत्रे दोन-तीन दिवसांत आणून दाखविणे आणि मागती घेऊन जाणे. त्याजवर तिसरे दिवशी सप्तमीस पत्रे घेऊन गेलो आणि मागती वाड्यांत बाबांस भटजींनी सांगितले की, आपले आज्ञेप्रमाणे हरिपंत पत्रे घेऊन आले, आपण अवकाश करून पहावी. उत्तम आहे, महोछाव जाल्यावर एक दिवस नेम करू, नंतर पाहू म्हणून सांगितले.