Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

१. त्याजवर नवरात्रांत उगीच भटजीची भेट मात्र जाली. दसरा जाल्यावर एकादशीस पत्रे पाहू म्हणून सांगितले आणि सर्वांस जमा केले. वादे आले. ते समयी सरकारकाम दुसरे होते म्हणून हे काम तसेच राहिले. परंतु मेघःश्यापंत बाबांसी शपथपूर्वक बोलले की, माझे दुसरे बोलणे नाही, आपण थोर आहां, पत्रे पाहून सांगाल ते कबूल करीन. ते समयी करार ठरला की, द्वादशीस सभा करू, दहा गृहस्थ विचक्ष बसवू आणि पत्रे पाहू. ते समयी भटजींनी पुसिले की दिसगत लागती. त्यास बाबांनी सांगितले की, त्यांची जबानी लेहून आणविली आहे ती येईल, तुमची पत्रे त्रिंबकपंताकडे विठ्ठलराव अण्णा घेऊन जातील आणि नकलाशी रुजू घालून फेरिस्त लेहून नकला व अस्सल पत्रे तुम्हांजवळ देतील, हे काम तीन दिवसांत करावे, हे काम जाल्यावर मागती वाड्यांत आम्ही पाहू. तेव्हा नकल व असल पत्रे रा त्रिंबकपंतांनी पाहून रुजू घातली आणि नकलेच्या पाठीमागे आपले हाते लिहून ठेविले. असे हे काम तयार जाल्यावर बाबांस मागती विनंति केली की, आज्ञेप्रमाणे त्याची जबानी व नकलासी असल रुजुवात करून फेरिस्ते केले आहे याउपरि आपण पहावी, म्हणजे गुंता नाही.


१ कार्तिक शुध्द ४ चतुर्थीस बाबांची गाठ पडली ते समयी बाबांस विचारिले की, पत्रे पाहावयासी अवकाश होत नाही. त्यास बाबा बोलले की, आम्ही तूर्त पाहात नाही, त्रिंबकपंतांनी पाहून नकलांशी रुजू घातली आहे. पत्रे माघारी पाठविणे, प्रयोजन लागेल तेव्हा आणवू. त्यास भटजी बोलले की, आपण पाहावी म्हणून आणिली आणि आता आपण न पाहाता न्यावी हे ठीक नव्हे, रुंजी घातली ही खरीच; परंतु आपण पाहावी नंतर नेवू. त्याजवर कार्तिक शुध्द ६ प्राथःकाळी वाड्यांत सर्वांस बोलावून सभा केली. भटजीस बोलावणे गेले. त्यांस सुतक आहे तेव्हा विठलराव अण्णास बोलाविले आणि पत्रे आणा म्हणून सांगितले. त्याजवर माहादाजीपंत व हरि सिध्देश्र्वर पत्रे घेऊन गेले. तेथे शिर्केराजे यांचे कज्याचे कागद पहावयासी लागले. दहा घटका दिवस आला. तेव्हा विठ्ठलराव यांनी विनंति केली की, आज आमची पत्रे पाहावी म्हणून सर्वांस जमा केले आणि काही पत्रे पाहिली नाहीत. तेव्हा बोलले की, च्यार पत्रे आज पाहू. त्याजवर आपले हाती सनदपत्र घेऊन नकलासी रुजू अक्षरशाह घातले आणि पत्रे च्यार ते दिवशी वाचू बोलले. तो दिवस फार आला, तीन पत्रे वाचिली आणि वाचली पत्रे त्यांची याद सरकारांत लेहून ठेविली. मागती पत्रे आमचे हवाली केली. नकलाही केल्या. ते समयी बोलले की, ही पत्रे देणे श्रीमंतांचे आहे, संसारखर्चास व धर्मादाव देणे दिल्हे, यांस दाईजाचे काय आहेॽ ऐसे बोलून उठिले. त्याजवर दुसरे दिवशी वाड्यांत बोलाविले तो विठलरावअण्णा लष्करांत गेले, म्हणोन राहिले. नंतर शुध्द ११ एकादशीस वाड्यांत विठलरावअण्णास घेऊन गेले, तेथे सर्व मंडळी होती, त्यांजदेखत पत्रे बाबांनी आपले हाती घेऊन अक्षरशः वाचून रुजू घातली. पहिली तीन व हाली बारा एकूण पंधरा पत्रे रुजू घालून फेरिसा लेहून ठेविली आणि पत्रे व नकला माघारे आम्हांजवळ दिल्ह्या. ते समयी बाबांनी आज्ञा केली की, नकला असल्याप्रमाणे जाल्या आहेत, नकला आपल्याजवळ ठेऊन असल पत्रे चासेच पाठवणे. ऐसे सांगितले. त्याजवर असल पत्रे घेऊन जावे. त्यास मागती बाबांची व भटजीची भेट जाली. पत्रे पाहिली, म्हणोन भटजीजवळ बाबांनी सांगितले. ते समयी भटजींनी बाबास विचारिले की, आपण पत्रे रुजू घातली, असल पत्रे चासेस हरिपंतासमागमे पाठवितो. त्यास बाबांनी सांगितले की, पत्रे ठेवून सत्वर यावे. त्यास, लवकरच येतील, म्हणून सांगितले. त्याप्रमाणे पत्रे चासेस आणून सरकारांत ठेविली. मागती मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदेस पुणियास गेले, तो भटजीचे घरी कन्येचे लग्न होते. बाबांची भेट जाली. लग्न जाल्यावर, एके दिवशी शुध्द ८ अष्टमीस बाबांनी त्रिंबकपंतास सांगितले की, मेघःश्यामपंतांनी लेहून दिल्हे आहे त्यांतील कलमे लेहून काढून हरिपंतास पुरशीस करावी. ऐसे सांगितले. त्याप्रमाणे पुरशिसीची कलमे सहा लेहून काढली आणि बाबा पुसो लागले की, जाबसाल करणे. ते समयी भटजी जवळच होते. त्यास बाबा म्हणो लागले की, हरिपंत कारकून माहीतगार नाहीत, पुरशिसीचे उत्तर कोण करितोॽ त्यास भटजींनी सांगितले की, वाद सांगावयाचा नाही, तशाहीमध्ये मातुश्रीचे सांगितल्याचे माहीतगारीने जे सुचेल ते उत्तर पचमशारनिले करितील, कदाचित न सुचेसे जाले तरी चास दूर नाही, जाऊन येतील आणि उत्तरे सांगतील. तेव्हा बाबांनी उत्तम म्हणून पुरशिसांची वाद हरिपंताजवळ देणे म्हणोन सांगितले. त्याजवर लष्करांतर त्रिंबकपंतदादा जाऊ लागले. ते समयी हरिपंतास मार्गशीर्ष शुध्द १० दशमीस बोलावून नेऊन सांगितले की, पुरशिसा लेहून काढिल्या आहेत त्यांची उत्तरे लेहून देणे. त्यासी उत्तर केले की, आम्हांस माहीतगारी काही आहे, काही नाही. त्यास त्याणी सांगितले की, राजश्री धारराव येथे आहेत, त्यांस पुसावे, ते सांगतील. त्याजवर रावजीस पुसिले. त्यांणीही सांगितले की, याचे उत्तर मातुश्रीस विचारोन लेहून घ्यावे. त्याजवर रा महादाजी अनंत यांचे घरी लग्न कन्येचे निघाले, म्हणोन वाड्यांत शास्त्रीबाबांजवळ निरोप मागावयासी गेले आणि सांगितले की, आपण याद पुरशिसीची दिल्ही आहे, त्यास आमचे घरी लग्न आहे, ते करू आणि पुरशिसीचे उत्तरही मातुश्रीस पुसोन पंधरा दिवसांनी आपल्याजवळ हरिपंत व आम्ही येऊ. ऐसे बोलले. तेव्हा मेघःश्यामपंती विनंती केली की, महादाजीपंताचे घरी लग्न, हरिपंतांनी जाऊ नये. तेव्हा त्रिंबकपंत बोलले की हरिपंत राहिले त-ही उत्तर होत नाही. यात्रेस गेल्याशिवाय जाबसाल होत नाही, उभयतां जाऊन येतील. तेव्हा बाबांनी आज्ञा दिल्ही. त्याजवर लग्न होऊन मागती पुणियास जावे तो काही कार्य लष्करात *