Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक १०४.
श्री.
१६७९ भाद्रपद वद्य ८. राजाश्रियाविराजित राजमान्य राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गो-
पोष्य रघुनाथ बाजीराव नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणे. विशेष. वे।। राजश्री धनराज दीक्षित काळे काशीकर यांस वर्षासन शंकर रुपये सन खमसांत करून तुम्हांस सनद सादर आहे. परंतु वेदमूर्तीस वर्षासनाचे रुपये अद्याप पावले नाहीत, म्हणून विदित जाले. त्यास सन खमसापासून साल मजकूर सन समानपर्यंत दरसाल रुपये शंभरप्रो चौसालां रुपये चारशे होतात. ते मारनिलेस पावते करणे. पेस्तर साल सन तिसापासून शंभर रुपये दरसाल पेशजीचे सनदेप्रमाणे पाववीत जाणे. सदरहू रुपये चारशे किसनचंद दि बलगोविंद सरकार यांस इटवियास चांगला ऐवज सरकारी चालीचा देणे, जाणिजे छ २० जिल्हेज, सु ।। समान खमसैन मया व अलफ. बहुत काय लिहिणे. हे विनंति. बार.

लेखांक १०५.
श्री.
१६७९ अधिक आश्र्विन शुध्द ९.
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री सदाशिव बाबजी गोसावी यांसी-
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार सु।। समान खमसैन मया व अलफ. वेदशास्त्रसंपन्न राजश्री सदाशिव दीक्षित ठकार यांजकडे मौजे याखतपूर पा सांगोले हा गांव पेशजीपासून इनाम आहे. त्याप्रमाणे करार असे. माहालचे हिशेबी वजा घातला आहे. त्याप्रो मारनिलेकडे चालवणे. मौजेमजकुरास आपणाकडोन कोण्हेविसी उपद्रव लागो न देणे. जाणिजे. छ ७ मोहरम. बहुत काय लिहिणेॽ