Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक १०६.
श्री.
१६७९ आश्र्विन वद्य ५.
राजश्री मोरोजी शिंदे नामजाद तालुके रत्नागिरी गोसावी यांसी-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने ।। बाळाजी बाजीराऊ प्रधान आशीर्वाद. सु।। समान खमसैन मया व अलफ. कसबा संगमेश्र्वर येथे श्रीरघुनाथाचे देवालय आहे. त्याची अलीकडे शाकारणी होत नाही. त्यामुळे देवळावरील वोंबण जाया होऊन इमारत भिजत्यें. त्यास शाकार सालदरसाल देवावा. वोंबण कुजले आहे ते नवे घालावे म्हणून रा. गोपाळ ज्योतिषी संगमेश्र्वरकर यांणी हुजूर विदित केले. त्यावरून हे पत्र तुम्हांस सादर केले असे. तरी सदरहू श्रीरघुनाथाचे देवालयास शाकार लागेल तो सालदरसाल देऊन शाकारणी करवीत जाणे. व देवालयाचे वोंबण कुजून जाया जाहले आहे त्यास कसबा मजकुरी गफाळ आगरांतील पोफळी गैरबरदार शेंडे वाळलेल्या आहेत, त्यांपैकी देऊन देवालयावरील वोंबण करून देवणे. व त्या देवास पूर्वीपासून नंदादीप व उत्छाहाचे सामान कसबा मजकूरपैकी पावत होते, म्हणोन मारनिलेनी विदित केले. त्यास येविशीची चौकशी करून काय चालत होते ते दाखल्या मुकाबल्यानिशी मनास आणून हुजूर लेहून पाठवणे. दस्तुर विदित जाहल्यावर आज्ञा कर्तव्य ते केली जाईल. जाणिजे. छ १८ सफर. बहुत काय लिहिणे ॽ