Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक ११३.
श्री.
१६८० वैशाख वद्य १.
श्रीमंतमहाराज मातुश्री आईसाहेब यांणी राज्यमान्य राजश्री बाळाजी पंडित प्रधान यांसी आज्ञा केली ऐसीजे- चिरंजीव शाहूबाबा यांसी कैलासवास जालियानंतर, साहेबांत व तुम्हांत कितेकांनी नानाप्रकारे विकल्प घालून राज्यांत बखेडे केले. येविशी वेदशास्त्रसंपन्न राजश्री सदाशिव दीक्षित ठकार यांणी श्रमसाहस करून, साहेबांचे व तुमचे एक लक्ष करून, बंदोबस्त केला. त्यावरून, साहेब यांजवर कृपाळू होऊन हे कुटुंबछळ, स्नानसंध्यादि षट्कर्मे आचरोन आहेत, यांचे प्रपंचाचा खर्च भारी यास्तव यांचे चालविलिया श्रेयस्कर, व हे पंधरा सहस्त्र रुपयांचे द्यावे, ऐसे साहेबी चित्तांत आणून तुम्हांस हे आज्ञापत्र सादर केले असे. तर वेदमूर्तीस पंधरा हजारांचे इनाम गांव स्वदेशी लाऊन देऊन यांस व यांचे पौत्रादि वंशपरंपरेने चालवणे. जाणिजे. छ १५ माहे रमजान, सु।। समान खमसैन मया व अलफ. बहुधान्यनाम संवत्सरे. बहुत लिहिणे तरी सुज्ञ असा.
श्री लेखन शुध.


लेखांक ११४.
श्री. नक्कल
१६८० पौष शुध्द ७. तीर्थस्वरूप राजश्री आबा वडिलांचे शेवेसी-
येथून हस्ताक्षर ताराबाईचे.
अपत्ये खंडेराव दरेकर दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असिले पाहिजे. विशेष. तीर्थरूप सयाजीबाबा कैलासवासी झाले ते समई अहीरवाडी येथील जमीन बिघे ८५ मळा-सुधां वेद।स्त्रसंपन्न कैलासवासी बाबदेवभट दीक्षित ठकार यांसी इनाम दरोबस्त करून दिली आहे. तेणेपो करार करून मौजेमजकुरीची जमीन पानथळासुधां वेदशास्त्रसंपन्न राजश्री सदाशिव दीक्षित ठकार यांचे स्वाधीन करून तेथील अनभवून सालदरसाल स्नानसंध्या करून राहतील. पूर्वीपासून वडिलावडील यांचे आपल् चालत आले आहे. पहिली जमीन पानथळा बिघे ८२ व किता जमीन कोरडवाहा बिघे ८३ येकून बिघे पांच पेशजी दिली. ते यांसी अगत्यरूप दिल्हे पाहिजे. यांचे वंशपरंपरंने चालवावे. शके १६८० सोळासे आइसी, बहुधान्यनाम संवत्सरे, पौष शु।। ७ सुक्रवार. हे विनंति.