Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक १०९.
श्री.
असलब ।। हुकूम नकल.
१६८० मार्गशीर्ष वद्य २. पो छ मार मुकाम पुणे. अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री विसाजी कृष्ण स्वामी गोसावी यांसी-

सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार. मु।। तिसा खमसैन मया व अलफ. किल्ले बेळगांव येथील प्यादे असामी ५ पांच तुमचे घरी पुण्यांत नेहमी चाकरीस देविले असेत. सदर्हू पांच असामींचा मुशाहिरा किल्लेमजकुरी खर्च लिहून पुण्यांत घरी चाकरी घेणे. जाणिजे. छ १५ रा बहुत काय लिहिणेॽ लेखन सिमा. मोर्तब. बार.

लेखांक ११०.
श्री.
१६७९ फाल्गुन शु।३.
राजाश्रियाविराजित राजमान्य राजश्री बाळाजी गोविंद स्वामी गोसावी यांसी-

पोष्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणे. विशेष. राजश्री वेंकटराव रायाजी कारकून तुम्हाकडे ऐवजाच्या कामास पाठविले आहेत. यास.
मशारनिलेचे उंटास दाणा दररोज कैली ८१ पायली व वैरण शिरस्तेप्रमाणे (वैशाख शु।।१ पासून तुम्हाजवळ राहतील) तोपर्यंत व पुण्यास येऊन पोचत तोपर्यंत बेगमी करून देणे. कलम १.
खाशास रोजमुरा एकमाही छ१ रजबी हुजूर दिल्हा असे. पुढे तुम्हाजवळ राहतील तोपर्यंत देत जाणे कलम १. मशारनिले महायात्रेस जाणार स।। सरकारकाम झाल्यावर यात्रेस जातां बक्षीस रु ३०० तीनसे.
एकूण दोन कलमे करार करून दिल्ही असेत. सदर्हुप्रो देत जाणे. व तीनशे रु महायात्रेस जावयास देविले असेत. पावते करून कबज घेणे. मारनिलेस सरकार कामकाज झाल्यावर रवाना करणे. रा छ २ रजब, सु।। तिसा खमसैन मया व अलफ. बहुत काय लिहिणेॽ हे विनंति.