Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक १०७.
श्री.
१६७९ आश्र्विन वद्य ८.
राजाश्रियाविराजित राजमान्य राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसी-
पोष्य बाळाजी बाजीराऊ प्रधान नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणे. विशेष. राजश्री त्रिंबक कृष्ण यांस तुम्हांकडील डौलाची देखील माहालाची वगैरे कुलसरमजम् सांगोन वेतन सालीना मोईन.
नक्त १००० रु. कापड १२५ आंख. एकूण नक्त रु एक हजार व सवाशे आंख कापड करार केले असेत. तरी म।।रनिलेचे हाते सरमजमूचे लिहिणियाचे प्रयोजन घेऊन सदरहूप्रमाणे वेतन पाठवीत जाणे. जाणिजे. छ२१ सफर, सु।। समान खमसैन मया व अलफ. बहुत काय लिहिणेॽ हे विनंति.

लेखांक १०८.
श्री.
१६७९ आश्र्विन शु।। १३.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी-

विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक नमस्कार विनंति उपरी येथील कुशल ता आश्र्विन शु।।१३ परियंत स्वामीचे आशीर्वादे सुखरूप असो. विशेष. आपण वेदमूर्ति राजश्री हरि दीक्षित गोरे यांजबद्दल पत्र पाठविले ते पावले. लिहिला वृत्तांत कळोन आला. आपले माझे आज्ञेप्रमाणे हरसुलातारेयाची मामलत करार करून सनदापत्रे भटजींबरोबर पो आहेत. प्रविष्ट होतील. वरकड कर्जाबद्दल वगैरे ऐवज येणे होता. त्याकरितां स्वामींनी लिहिल होते. त्यास त्याचाही निर्गम करून दिल्हा. चवाणाकडील किल्ल्यांचे राजकारणाचा मजकूर लिहिला. त्यास लाभ थोडा आणि सर्फराजीचे करणे फार प्रस्तुत पडते, ऐसे जाणोन, प्रस्तुत उपेक्षा केली. पुढे प्रसंगोचित करणे तेव्हां करूं. वरकड मुखवचने भटजी सांगतां कळो येईल. निजामअल्ली जबरदस्त होत चालला..... याचा विचार काय केला आहेॽ आम्ही कोणता प्रकार करावा, हा विचारावा. रा छ ११ सफर. हे विनंति.