Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अकरावा ( १६९१-१७६०)
१ याउपर देवळी जाऊन नमस्कार केला. त समई बाबांनी पुसिले की, तुमचा मुचलका का येत नाही, माघारे उणे अधिक बोलावे हे थोरपणास अयोग्य त्यास मुचलका देणे. त्यास उत्तर केले की, माझी दौलत आणि घोडी, व दत्तपुत्राचे ऐवजी मीच पुत्र आहे. तीन गोष्टी सांगितल्या. ते समयी बाबांनी सर्वांदेखत सांगितले की, यांस दत्तपुत्र घेऊन अठरा वर्षे झाली, श्रीमंतांस ठाऊक आहे, कागदपत्र शिक्के वगैरे झाले, तुम्ही साठ वर्षांचे पुत्र म्हटल्याने काय होत असतो की काय, तेव्हा पुत्राची गोष्ट आजपासून काढू नये. दुसरी दौलत महादाजीपंत पन्हाळ्यापासून काय घेऊन आले ती यांचे अंगी लावून द्यावी, म्हणजे त्याप्रो तुम्हांस प्राप्त होईल, जेथून श्रीमंतांचा शरीरसंबंध जाला त्या दिवसापासून जे आहे ते मातुश्री ताईंचे भाऊ कृष्णराव यांसच आहे, तुमचा संबंध त्यांत नाही. तुम्ही बापाचे हातचे मिळविले असेल त्यासी बोलावे, रामचंद्रपंत तुमचा भाऊ खरा, परंतु शरीरसंबंध श्रीमंतांसी जाला, तुम्हापासून इकडे आले, यास्तव कृष्णराव याजवळच राहिले, ते भाऊ तुम्हास तुटले, यांचे भाऊ खरे, त्यांस वाटा यांनी दिल्हा आहे, तुम्ही वावगे एकंदर बोलत न जाणे, मुचलका लिहून देणे म्हणजे त्यांचा मुचलका लेहून घेतो, आणि अस्सल पत्रे आणून पाहतो. ऐसे सांगितल्यावर उठोन आले. त्याजवर दुसरे दिवशी शास्त्रीबाबांचे घरास न जाता, रा त्रिंबकपंताचे घरी जाऊन सांगितले की, आम्हांस मुचलक्याची ताकीद जाली आहे, परंतु आमचे बोलणे समक्ष आहे. त्यास त्रिंबकपंतांनी मान्य केले की, कांही चिंता नाही, बाबांस विनंति करून बोलणे करितो. त्याजवर भटजी मागती देवळी देवदर्शनास गेले. तेथे बाबांनी सांगितले की, मेघःश्यामपंत आले होते, त्यांनी तीन गोष्टी बोलले, आम्ही प्रतिउत्तरे सांगून मुचलका देणे निक्षून ताकीद केली आहे. त्याजवर बाबांचे शरीरी काही समाधान वाटेनासे जाले म्हणून घरी राहिले. तेथे मेघश्यामपंती जाऊन विनंति केली की, आमचे बोलणे हेच की, आपण आपले दृष्टीने एक वेळ पत्रे अस्सल पाहावी, नकलांप्रमाणे असल्यास जे आज्ञा करणे ते करावी, आपली निशा पडल्यावर माझा आग्रह नाही, सांगाल त्यास मान्य असो. ऐसे होवून घरास आले.