Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अकरावा ( १६९१-१७६०)
१ फाल्गुन वद्य ५ पंचमीस पत्रे दाखवावयाकरिता हरि सिध्देश्र्वर पाठविले. त्यास, तेथे कांही सरकारांत चार दिवस कामकाज बंद झाले होते. मातुश्रींची आज्ञा की, वेदशास्त्रसंपन्न रा शास्त्रीबाबांजवळ प्रवेश नाही आणि त्यांसी बोलावयाची योग्यता नाही त्याअर्थी वेदशास्त्रसंपन्न रा केसोभट साठे आपले ग्रामस्थ, आणि पहिल्यापासून वर्तमानही त्यांस ठावके आहे. शास्त्रीबाबांजवळही जाणे आहे, यास्तव चार पत्रे आहेत ती त्यांचे हातून दाखवावी. त्याप्रमाणे पुण्यास जाऊन त्यांजला वर्तमान सांगितले. त्यासी त्यांनी सांगितले की, आम्हांस मातुश्री वडील आहेत, तर शास्त्रीबाबांनी बोलावणे पाठविल्यास जाऊं, तुम्ही मातुश्रींचे आज्ञेप्रमाणे विनंति करणे. त्याजवर हरि सिध्देश्र्वर यांनी राजश्री त्रिंबकपंत वर्तक यांची भेट घेतली; आणि चासेहून आलो आहे, मातुश्री रखमाबाईंनी पत्रे पाठविली आहेत, त्यास शास्त्रीबाबांचा परिचय नाही. यास्तव वेदशास्त्रसंपन्न रा केसोभटजीचे हाते पत्रे दाखवावी. आमचा वाद पहिल्यापासून कोणाचा नाही, आणि हालीही वाद सांगणे नाही, सरकारची मर्जीपत्रे दाखवावी म्हणून घेऊन आलो आहे, त्यास आमची विनंति बाबांस करून भटजीकडून पत्रे पहावी. त्याजवर पंधरा दिवस वाडयांत कारभार झाला नाही. गडबड ज्यांनी करावयाचा मनसुबा केला होता त्यांसी शिक्षा करून, उपरि बाबा चैत्र व || १ प्रतिपदेस वाड्यांस गेले. सर्व मंडळी जमा झाली. तेथून बोलावण आले की, पत्रे घेऊन वाड्यांत बोलाविले आहे. त्यास बोलावणे आला होता त्यास सांगितले की, बाबांस विनंति करावयाविशी सांगितले होते की, वे || रा केसोभटजीस बोलावून आणून त्यांचे हाते पत्रे पहावी. त्यासी त्याने सांगितले की, आधी बोलावणे त्यांजकडे गेले, मग तुम्हांकड आलो. त्याजवर हरि सिध्देश्र्वर व हरि गणेश उभयतां रुमाल घेऊन वाड्यांत गेलो. तेथे शास्त्रीबाबांस नमस्कार केला. त्यांनी त्रिंबकपंतांस पुशिले की, हे चासेहून आले आहेत, त्यास पत्रे वे ||रा | केसोभटजीचे हाते दाखवावी, ऐसे यांचे मानस आहे, त्यास भटजीस बोलावणे गेले होते, घरी नाहीत, म्हणून सांगितले. त्याजवर बाबा म्हणो लागले की, ते ति-हाईतनसले तरी चिंता काय, आपण आज प्रारंभ करावा, दोन पत्रे पहावी. त्याजवर , हरि सिध्देश्र्वर यांणी विनंति केली की, आम्ही चासेहून आलो, त्यास मातोश्रीबाईंनी अगोदरच पत्रांच्या नकला पौषमासी श्रीमंतांस दाखवावयासी पाठविल्या होत्या, ते समयी मातुश्री सगुणाबाई बाईंची वडील सून, येथेच राजश्री परशरामभाऊ मिरजकर यांस भेटावयासी आली होती, ते समई सरकारास अवकाश पडला नाही, म्हणोन आपल्यास पत्रे दाखवावी, आम्हांस वाद बोलणे नाही, आणि पुरुष होते ते समई वाद काढिला नाही, आम्हांस पूर्वीपासून जे दिले आहे ते श्रीमंतांनी दिल्हे आहे, सर्व चालवणे श्रीमंतांस आहे. ऐसे आहे. त्यांस आपली आज्ञा की, पत्रे आणून दाखवावी. त्यास आपल्याजवळ येऊन बोलावे आणि पत्रे समजवावी, हे योग्यता आमची नाही, जुना कारभारी तोही राहिला नाही. यास्तव आमचे ग्रामस्थ वे || रा केसोभटजी साठे याचे हाते एकीकडे वाड्यांत पत्रे दाखवावी ऐसे मातुश्री सगुणाबाईंनीही सांगितले आहे आणि समक्ष वे || केसोभटजीचे गरास जाऊन सांगितले. हाली मातुश्रीबाईंची आज्ञा आम्हांस ऐसीच आहे. यास्तव घटजी आल्याशिवाय पत्रे दाखवावयाची नाहीत. ते समई बाबांस राग आला आणि चार गोष्टी अधिकारयुक्त बोलले. आपण उत्तर केले की, आपण वडील आणि सुज्ञ आहेत, परंतु आमची विनंति येणेप्रो आहे. इतके होते आहे तो वे || रा केसोभटजी बाहेरून घरास आले तो समजले की, वाड्यांतील बोलावणे आले होते, म्हणून तैसेच वाड्यांत आले. तो शास्त्रीबाबा रागे भरले की भटजीस बोलावीत नाही आणि ति-हाईत आहेत, तेव्हा त्यांचे समक्षच दाखवावयाचा आग्रह. त्यांजवर आम्ही विनंति केली की, आपण येक वेळ पत्रे त्यांचे समक्ष पहावी आणि आज्ञा करणे ते करावी. ते समई बाबांनी आज्ञा केली की, दाईजाचा वाटा सुटत नाही, तुमचे धणियाची आशा वाद सांगावयाचा नाही; परंतु आम्ही ऐकत नाही, वाजवी मनास आणू, मुलूक जप्त करू. याजवर विनंति केली की, आमचा आग्रह नाही, देणेही श्रीमंताचे आहे, हाली सर्वस्व घेतले तरी धणी आहेत; परंतु दाईजाचे काही लागत नाही. आपण पत्रे पाहून आज्ञा करणे. त्यास, पत्रे काढा म्हणून आज्ञा केली. त्यास कचेरीत काढावयाची नाहीत, वादच सांगणे असता तरी जेथे म्हणाले तेथे काढतो. त्याजवर श्रीमंतांचे वाड्यांत देवघरापुढील दिवाणखानियांत वेदशास्त्रसंपन्न शास्त्रीबाबा व केसोभटजी व रा|| त्रिंबकपंत वर्तक व हरिसिध्देश्र्वर व हरि गणेश व आणखी दोघेजण गृहस्थ देवघरांत होते ते, ऐसे बसून बाबास पत्रे वाचून दाखविली व वर्तमान साकल्य मातुश्रीबाईंनी सांगितले होते त्याप्रो वे || रा केसोभटजींनी सांगितले. तेव्हा बाबा म्हणू लागले की, तुम्हांस माहितगारी चांगली आहे. त्यास, भटजी बोलले की, आमचे वडील त्यांचे आश्रित, त्यांचे संग्रही साठ पासष्ट वर्षे आहो, सर्व मजकूर त्याजकडील ठावका होता तो व मातुश्रींनी सांगितला होता तो आपल्याजवळ सांगितला आहे. त्यांचे घरी कोण्ही घरधरणी व कारभारी जुना माहीतगार नाही, जे आहे ते मातुश्रीस ठावके आहे, आणि पत्रे याप्रो आहेत, साठ वर्षे कोण्ही बोलले नाहीत, आणि हाली सरकारांत समजावून पत्रे पहावी म्हणून परवानगी आणली. त्यासी बाईचे बोलणे हेच की, जे आहे ते सर्व श्रीमंतांचे देणे आहे, आमचे व कोण्हाचे कांही नाही, श्रीमंतांनी सर्वस्वे घेतले तरी घेवोत, ठेविले तरी ब्राम्हण खातील, ऐसे आहे. त्याजवर बाबांनी आज्ञा केली की, आह्मांस समजले नव्हते; परंतु तुम्ही सांगितले व पत्रे दाखविली, त्यास यांत गुंता नाही; परंतु वाद्या म्हणतो की पत्रे आणून पहावी म्हणून पाहिली, याउपरी आणखी येकदोन वेळ समजून घेतले पाहिजे. यास सात घटका रात्र जाली. नंतर सर्वांस आज्ञा दिल्ही, आपापले घरास जावे. येणेप्रो वर्तमान चैत्र व ||१ शके १७०२ या दिवशी जहाले