Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक ११५.
श्री.
१६८१ आश्र्विन वद्य २.
राजश्री जनार्दन आपाजी फडनीस दि।। गोविंद बल्लाळ गोसावी यांसी-

स्नो सुभानजी पुणेकर व माणकोजी मदने व रघोजी देवकान्ते व हिरोजी सोनवळकर मौजे मुधोळ प्रा मिटुर. रामराम विनंति उपरी. पिराजी माने याजकडे आपण शिलेदारीने होतो. त्यांचे आमचे बनेनासे झाले. तेव्हां गोविंदपंत याणी कालपीहून समजावून आणून त्यांची आमची समजोत करूं लागले. बिद बनेनासी झाली. तेव्हां मारनिलेनी चाकरीस आपले सरकारांत ठेविले. कार्तिकमासापासून अठरा स्वारांनी चाकरी केली. कांही दिवस रोजमुरा दिला. कांही दिवस न दिला. अथवा निरोप न दिल्हा. रोजमुरा नालबंदी देऊं दिलाऊ म्हणून आषाढमासपर्यंत चाकरी घेतली. शेवटी आषाढमासी माने चाकरी टाकून गेल्याउपर नवी बोली करून म्हणो लागले. तेव्हां आपण वाण्याचे कर्ज खाल्ले. चाकरी केली तो पैसा देईनासे झाले, याकरितां रजा घेतली. वाण्याचे कर्ज खाऊन चाकरी केली. वाणी घोडे सोडून नेतो, ऐसे जाले! याकरितां आपण वाणियाचे कर्ज वारून आम्हांस पोट भरावयासी निरोप दिल्हा. ते वाणियाचे रु वारले. नांवनिशी वि ।। ता रु।

४०५ सुभानजी पुणेकर १०१।। बेळाजी पालवे
१२७ माणकोजी मराठे  २५ शिवाजी
११५ रघोजी देवकान्ते ३६।। विठोजी पालवे
१३४ हिरोजी सोनवळकर  १६३
७८१  ९४४


एकूण नऊसे चवेताळीस आपण देऊन वाणियाचे कर्ज वारले असे. तुम्ही आम्हांस सदरहू रु दिल्हे ते राजश्री गोविंद बल्लाळ याजपासून घेणे. हा कबज लेहून दिल्हा. सही. तारीख १६ सफर, आश्र्विन वद्य २ शके १६८१, प्रमाथीनाम संवत्सरे, सही नि।। कटार (याखाली आकृति आहे).
दि।। म्हल्हार त्रिंबक पोफळे, जोशी, कुळकर्णी, मोजे कासुर्डी, ता सांडस, प्रांत पुणे.
गाही.
पत्र प्रमाण साक्ष         डुगोजी तुपे, मौजे
खंडेराऊ त्र्यंबक          उरली, ता सांडसे,
दि।। पाराशर दाजी     प्रांत पुणे


लेखांक ११६.
श्री.
१६८१ ज्येष्ठ.
यादी दस्तर्के निसबत राजश्री संताजी वा दि।। राजश्री मल्हारजी होळकर. सु।।सितैन मया व अलफ. साल गुदस्तप्रमाणे सालमजकुरी.
१ दस्तक बैल सर ४० खेरीज फिरंगाण कोंकणातून हर जिन्नस खरेदी करून काजे काटापूर ता अवसरी येणे. आणताल, आणूं देणे. कोणेविशी मुजाहीम न होणे, जकातीचा तगादा न करणे, म्हणोन.
१ दस्तक भैसेरे सुमार २५०० हरएक जागा रिकामे रानी चारा पाणी पाहोन चारितील त्यास चारूं देणे, कोणेविशी मुजाईम न होणे, म्हणोन.
१ दस्तक आळंदीचे यात्रेहून घरखर्चा ब ।। हर जिन्नस खरेदी करून उंटे, तट्टे मिळोन एकवीस मौजे कवणुरास आणितील. त्यास, आणूं देणे, कोणेविशी जकातीचा तगादा न करणे, म्हणोन.
१ दस्त प्रां।। जुनर व पुणे येथे थोडी रास ५ खरेदी करून आणितील. त्यास आणूं देणे. म्हणोन.