Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अकरावा ( १६९१-१७६०)
लेखांक ९९.
श्री.
१६७९ भाद्रपद वद्य ९.
...............................................
हे व पुढील दोन पत्रे फाटकी आहेत, केवळ तुकडे आहेत, परंतु महत्वाची आहेत. एका हातची आहेत.
आज्ञाधारक कृष्ण .........कृतानेक सां नमस्कार उपरी विनंति. यापूर्वी विनंतिपंत्र साकाल्या लिहिले आहे. त्याजवरून अर्थ ध्यानास आलाच असेल. राजश्री जानोजी भोसले यांसी व राजश्री बाबूराव कोणेर, यांसी कित्तेक प्रकार निजामअल्लीचे येणे इकडे न होय याअर्थी व त्याजप्रो कांही फौज अथवा राजश्री येशवंतराव कोणेर यांचे येणे तलबी न होय याअर्थी लिहिवणे ते राजश्री रघुनाथ अनंत वकील........ (पाठीमागे)............... राजश्री बाबुराव.......... आपले हाते पत्र लिहिले आहे. ते व जिन्नस, हुजूर पाठविले आहे. त्याजवरून अर्थ कळो येईल. व राजश्री रघुनाथ अनंत यांचे पत्री त्यांनी लिहिले आहे की, आम्ही सहस्त्र प्रकारे निजामअल्लीचे येणे तिकडे न होय ऐसाच प्रकार करितो. आम्हांस श्रीमंत व पंतप्रधानस्वामीची मर्जी जरूर व ते .. जे आज्ञा ..... होईल त्याप्रो...