Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक ९७.
श्री.
१६७९ भाद्रपद शु।। ११.
राजश्री कृष्णाजी हरि साठे गोसावी यांसी- अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री स्ने तुळसाजी वाघ व हैबतराव वाघ मुकाम लष्कर, नजीक उज्जन, दंडवत विनंति उपर येथील कुशल ता छ ९ माहे जिल्हेजपर्यंत यथास्थित जाणून स्वकीय कुशल लिहित जाणे. विशेष. (आपण) पत्र छ ११ सवालचे पाठविले ते उत्तम समई पावोन संतोष जाला. कापडाचा मजकूर लिहिला. त्यासी, अगत्य लागल्यास घेतले जाईल. दुसरे, श्रीमंतांनी सि-याचा मजला घेऊन श्रीरंगपट्टणास गेले म्हणोन लिहिले ते कळो आले. इकडील राजकी वर्तमान श्रीमंत दादासाहेब व होळकर, सिंदे, भोसले ऐसे एकत्र मुकाम मजकुरी फौजांसुध्दा आहेत. कोणीकडे जावयाचा मनसबा होईल तो पहावा. बहुत काय लिहिणेॽ कृपा लोभ कीजे, हे विनंति इ.इ.

लेखांक ९८.
श्री.
१६७९ भाद्रपद वद्य ९.
........................पत्र
.........................सरकारची आज्ञापत्रे मज
(विसी) तीर्थस्वरूप राजश्री जीवनराव केशव यांजला पावली जे, परस्पर मिळोन सरकारचे काम साधावे. त्यास, इतके दिवस ते मजशी नाखुषी चालवीत होते यास्तव मीही यांसी सरळ नव्हतो. परंतु मी आपणाकडून अंतर पडो दिल्हे नाही. असो. सांप्रत सरकारचे ताकिदीवरून एक जालो. परस्परे मागील गिला दूर करून पुढे सरकारचे काम साधावे हा निश्र्चय जाला. त्यांच्या माझ्या अलीकडे एक दोन भेटी याच होऊन परस्परे ....... जाले परंतु अद्याप.............
(पाठीमागे)
.................जालासा कळेल. विदित होय. काल छ २२ जिल्हेज नबाबांनी दरगाहकुलीखान पंच हजारी करून झालरदार पालखी दिधली. कळले पाहिजे. तीर्थस्वरूप राजश्री जीवनराव केराव यांनी मजकडून पत्र लिहविले. व खाली दोन वळी आपले हाते लिहिल्या. तवां मज हातींही लिहिविले ते लिहून ते पत्र अलाहिदेच पाठविले आहे. पाहून अर्थ कळो येईल. हे विनंति.