Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक ९५.
श्री.
१६७८ आश्र्विन शु।।३.
राजाश्रियाविराजित राजमान्य राजश्री शिवाजी बल्लाळ गोसावी यांसी-

सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहिणे. विशेष. तोरापा नाईक अनगलाहाळी पो अथणी यांजकडे राजश्री विश्र्वनाथ जपवैद्य यांचे कर्ज येणे आहे, त्यास बहुत दिवस झाले असतां मागितल्यास कर्ज वारीत नाही, येविसी ताकीद जाहाली पाहिजे, म्हणोन मा।। रनिल्हेनी हुजूर विदित केले. त्याजवरून, हे पत्र तुम्हांस सादर केले असे. तरी तुम्ही तोरापा मजकूरास आणून, त्यास बरे वजेने ताकीद करून, मा।।रनिलेचे वाजवी कर्ज येणे असेल ते खताब।। व्याजसुध्दां वारून देवणे. येविसी फिरोन बोभाट येऊं न देणे. जाणिजे. छ २ मोहरम, सु।। सबा खमसैन मया व अलफ. बहुत काय लिहिणेॽ मोर्तब असे.
सदरहू अस्सल पत्र रा मिरज ता मोराजी बागडा. आश्र्विन वद्य २ रविवार.

लेखांक ९६.
श्री.
१६७९ चैत्र शु।। ८.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेवबाबा दीक्षित स्वामीचे सेवेसी-

सेवक जानोजी भोसले सेनासाहेब सुभा दंडवत विज्ञापना येथील कुशल ता छ माहे रजब मुकाम प्रतिष्ठाण पर्यंत सेवकाचे वर्तमान य़थास्थित असे. विशेष. स्वामीचे भेटीची बहुत अपेक्षा आहे. आपणांस हे विनंतिपत्र लिहिले आहे. तरी, कृपा करून सत्वर भेटीस आले पाहिजे. प्रतिष्ठानी मुकाम करून येथेच भेटीचा योग करावा तरी, वराडप्रांती नबाब निजामअल्ली अलजपुराहून बाहेर निघाले आहेत. त्यास, आम्हांकडील राजश्री रघोजी करांडे तिकडे आहेत. त्यांसी हर्शामर्ष मांडिला आहे, म्हणून सांप्रत आमची बातमी आली आहे. त्यास नबाब सलाबतजंगाचा आमचा स्नेह. याजकरितां उभयपक्षी हर्शामर्ष न वाढवावा म्हणून वराडप्रांती जाण्याची त्वरा आहे. यास्तव येथे मुकामाचा योग घडला नाही. उदईक कूच करून जाणार. खांदेवर जात असो. तेथे आपले भेटीकरितां मुकाम नेमले आहेत. तरी जाफराबादचे मुकामी सत्वर आले पाहिजे. आपले समागमे राजश्री शामराव विश्र्वनाथ यासही भेटीस घेऊन यावे. सर्वस्वे कैलासवासी तीर्थरूपांमागे आपण वडील आहेत. आपले भेटीचा लाभ घेतल्यावांचून वराडांत उतरत नाही. तरी अगत्य यावे. सविस्तर वे ।। शिवभट साठे लि ।। त्यावरून अवगत होईल. सेवेसी श्रुत होय, हे विज्ञापना.