Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
महिकावती (माहिम)ची बखर
इतुकें वचन आईकिलें ।। संन्याशानें लोटांगण घातलें ।।
उठोनि हृदइं आळंगिलें ।। तया अयुताचनासी ।। १८३ ॥
धन्य मी आजि जालों । आपलें वंशिकांसि भेटलों ।।
थोर हृदईं सतोषलों ॥ कीर्त आईकोनी ।। १८४ ॥
मग म्हणे तापसी ॥ शामकर्ण नाम आम्हासी ॥
सांडिलें पैठणराज्यासी ॥ संतान नाहि म्हणोनी ॥ १८५ ।।
तरि आतां माझी विज्ञापना ।। राज्य द्यावें तुमचियानंदना ॥
धर्मपुत्र मज सामान्य ।। हा चि अर्थ राया ॥ १८६ ॥
इतुकें वचन ऐकोनी ।। प्रधानासिं बोलावोनी ।।
विचारतां जाला अयुताचन मनी ॥ कैसें करावें ।। १८७ ॥
प्रधानासि मानलें ते वचन ।। ईतर नव्हे आपला वंशिक जाण ।।
मग करोनियां सन्मान ।। शामकर्ण मंदिरी नेला ॥ १८८ ॥
अर्ध्वपाद्यें पूजा केली ।। भोजनविधीं संपादिली ॥
अष्टगंधें चर्चिली ।। येथानिगुती ।। १८९ ।।
विडे घेतले सकळि जाण ॥ पालाणिले चातुरंग सैन्य ।।
आले सर्व मिळोन पैठण ।। प्रधानवर्गी ॥ १९०।।
राया अयुताचनाचा नंदन ।। जो बत्तीसलक्षणि संपूर्ण ॥
धनुर्धरविद्या दारुण ॥ पवित्र पुण्यशिळ ॥ १९१ ।।
ब्राह्मण मेळविले अपार ॥ दाने दीधलिं गंभीर ॥
वांटिली द्रव्याची भांडार ।। ब्राह्मणा कारणे ॥ १९२ ॥
राज्याभिषेक केला वज्रनाभा । सिंहासनि बैसविला वोजा ।।
मोहोत्सव जाला सहजा ।। पैठणि जाणा ॥ १९३ ॥
वज्रनाभ राज्याधिकारि केला ॥ अयुताचन तेथोनि मुरडला ।।
उज्जनीनगरि येवोनि राहिला ॥ सह दळेसीं ॥ १९४ ॥
मग वज्रनाम नांदति पैठणी ।। परंपरा चालली तेथोनी ।।
ते आयेका चित्त देवोनी ॥ सांगतों आतां ॥ १९५ ॥