Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
महिकावती (माहिम)ची बखर
शांतनादित्यें पण बांधिला ।। वज्रविहु असे उभारिला ।।
जो तिहि शरि भंगिल तयाला ॥ कंन्या आणि राज्य ॥ १४१ ।।
ऐसा पण दुर्घट ॥ राव पाहाति सकळिक ।।
येकमेकां विचार देख ॥ मांडला तेथें ।। १४२ ।।
ऐसें असतां तया स्थानी ।। राव इंद्रशेन बोले वचनी ।।
नीर्विर्य होता आम्हा लागुनी ।। अपेश असे ॥ १४३ ॥
शोमवंशि आम्हासि उत्पती ।। ज्याची युगांतरि किर्ती ।।
ते आम्ही धर्ममूर्तीं ।। काये आम्ही प्रति सांगताहे ॥ १४४ ॥
क्षण न लगतां वज्रविहु भंगु ।। कीं भुगोळ पालथा घालुं ।।
आज्ञा घेउनि कल्होळु ।। गेला तेथे ।। १४५ ॥
प्रथम बाणि विहु भंगिला ।। दुसरा बाण कोठे टाकु पुसता जाला ।।
तें देखोनि संतोषला ।। शांतनादित्य ।। १४६ ॥
हस्तिणि धावोन आली ।। माळ कंठि घातली ॥
देविं पुष्पवृष्टि केली ।। स्वर्गी होउनिया ॥ १४७ ॥
ॐ पुण्या वेदमंत्रे जालें ।। नाना वाद्यें वाजो लागलें ।।
राज्य सर्व अर्पिलें ।। राया चंद्रसेनासी ।। १४८ ॥
सोहळा संपादिला आनंदें ।। दाने वांटिली अगाधें ॥
राज्य करिती स्वानंदे ॥ शांतनादिव्य आणि इंद्रसेन ॥ १४९ ।।
तेथे इंद्रशेनाची परंपरा ।। उज्जनिनगरि अवधारा ॥
ते सांगतो सविस्तरा ।। आईका श्रोते ।। १५० ॥
इंद्रसेन १ चंद्रशेन २ रामसेन ३
महिंद्र ४ पुरंद्र ५ प्रतापसेन ६
नीळसेन ७ गंधर्वसेन ८ सोभद्र ९
पुरंदर १० इंद्रसेन ११ गंधर्वसेन १२