Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
महिकावती (माहिम)ची बखर
मग बोलावोन द्विजोत्तम ।। फळ दाखविले उत्तम ।।
तें देखोन आश्चिर्य जाण ।। करि वेदमूर्ती ॥ १६५ ॥
ब्राह्मण विनवि अमृतवचनी ।। राया तू सत्यवादी कृपापर्णी ॥
हें फळ स्वता भक्षिलें नाहि कीं ।। हे सांगिजे नृपवरा ।। १६६ ॥
तेषवां राव खोंचला मनी ।। म्हणे विपरित जालि हे करणी ॥
बोलाविली कामिनी ।। सभेमाजी ॥ १६७ ॥
सत्य सांगे पतिव्रते ।। तुज म्या फळ दिधलें होतें ॥
तें, काये केलें कांते ।। तें सांगिजे मजे ॥ १६८ ॥
वचन ऐकुनि, सकळी ॥ जैसी चंडवातें उन्मळे कर्दळी ॥
कीं जळाविण मासोळी ॥ तैसि कोमली लज्जित ।। १६९ ॥
राया मनि खेद जाला । तयातें वैराग्य आठवला ॥
शरिरि कांटाळा भरला ॥ उतरला सिंहासना खालुता ॥ १७० ।।
॥ श्लोक ॥
या चिंतयामि शततं महि षा विरक्ता ।।
शाप्यनमिच्छति जन स्व जनोन्यशक्ता ।।
अस्मिन्कृत च परितुस्यति काचिदन्या ।।
धिग् तां च तां च मदनं च ईमां च मां च ॥ १ ॥
मग विक्रमादित्य बोलाविला ।। राज्याभिषेक तयासि केला ।।
आपण वानप्रस्त जाला ॥ योगअभ्यासी ।। १७१ ॥
मग मृतहर गेला वनासी ॥ विक्रमादित्य बैसला सिंहासनासी ॥
राज्य चालविलें यथानितिसी ।। विक्रमादित्य ।। १७२ ॥
युद्धीष्ठिर शक सारिला ।। आपला शक चालता केला ॥
मग शाळिवाहन जन्मला ॥ पैठण नगरी ।। १७३ ॥
ब्राह्मणकन्येचे पोटी स्पष्ट ।। शाळिवाहन जन्मला शुभट ।।
तो शकाधिकारी बळकट ।। त्याणें विक्रमातें मारिलें ॥ १७४॥