Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

दीनमुर्ति राजा गंधर्वसेन ॥ नांदतां उज्जनिनगरि जाण ॥
कथा वर्तलि गहन ॥ ते आईका आतां ॥ १५१ ॥
कोणे येके दिवसी ।। राजा गेला पारधिसी ।।
वनि हिंडतां तयासी ।। अपुर्व वर्तले अवधारा ।।१५२ ॥
अपसरा खेळति जलक्रिडा सरोवरी ।। वस्त्र ठेवोन वृक्षावरी ॥
गंधर्वसेन ते अवसरी ॥ पावला तेथें ॥ १५३ ॥
तंव त्या देखिल्या नग्न ।। रायासि बाणला कामबाण ॥
उभा राहिला वस्त्र घेवोन ।। सरोवरतिरी ॥ १५४ ॥
तें देखोनि अप्सरा ।। क्रोधें खवळल्या अवधारा ।।
शाप वदल्या दुर्धरा ।। गर्भव होसि म्हणोनी ॥ १५५ ॥
तें ऐकुनि शापवचन ।। हृदईं खोचला गंधर्वशेन ॥
ऊशाप मागों आदरिलें त्यो लागुन ।। विनती करोनियां ॥१५६॥
मग दीधला ऊशाप ॥ रात्रि पुरुष होसि साटोप ।।
दिवसा गर्धवशरिर प्राप्त ।। होसि निरुतें ॥ १५७ ॥
ऐसा ऊशाप ऐकोन ।। राजा गर्धवशरिर झाला जाण ॥
सेवक विस्मय करिती मनी ॥ अपुर्व जाण ॥ १५८ ॥
दिवस तेथें क्रमला ।। निसी होताच पुरुष जाला ।।
मग ग्रहासि आला ।। राजा गंधर्वसेन ॥ १५९ ॥
अपुर्व सर्वासि जालें ।। राया शापवचन घडले ॥
नाव गंर्धवसेन पावले ॥ राजेंद्रासी ।। १६० ॥
मग राज्य भृतहरासि दिधलें ।। तयास सिंहासनि बैसविलें ॥
त्याणे उज्जनिचें राज्य केलें ।। संवत्सर ९० ॥ १६१ ।।
मग तेथे अपुर्व वर्तले ।। रायासिं ब्राह्मणे अमरफळ आणुनि दीधलें ।।
तें फळ रायें राणिये प्रति अर्पिलें ॥ मनोभावें ॥ १६२ ।।
मग ते अंगनसेना ।। परद्वारि प्रवर्ते जाणा ।।
तें फळ तिण्हे अश्वदासा ।। प्रति अर्पिले ।। १६३ ॥
त्याण्हे तें फळ सेणपुरिसि दीधलें ।। तिणें तें घेवोन बीजें केलें ।।
तें भृर्तहरिने दृष्टि देखिलें ।। मग आणिलें मंदिरी ॥ १६४ ।।