Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

यानंतर स्वामिहि कोळंबा गोत्रि वंशिचे च्यार पुरुष व शिळंबा वंशिचे च्यार पुरुष त्यांस सुतारकर्म बळत्कारें सिखविलें ।। कां जर राजसेवा घडित माहालें घरें करावि ह्मणोन ॥ तरि राजश्री स्वामीहि सर्वांस आज्ञा केलि कि हे अष्टपुरुष तुह्मा मध्यें येतिल ।। तरि यांसि बहुमान चौघल्यां मागां करावा ।। तरि हा दिंवस परियंत तुह्मी आह्मि चालवितचि असों ।। आणिक यांस बहुमान ॥ यैसा जर कोण्हि कोण्हि जातिचा हें कर्म सुतारपणाचें सिखला तो अथवा सरदेशाये अथवा देशाय व कोण्ही विद्या करिल त्याणे गुरुदक्षणा विडा शक्तिनुसार या पुरुषांचे वंशास द्यावा ।। आणि बहुमान करावा ।। ऐसें गोसाविंयाहि सर्वांस श्रुत केलें ॥ तेव्हां अनंत देशले व देवदेशले हे दुवर्धि पुर्वपक्ष केला तो यैसा ।। जर राजश्री कृपावंत होवोन यांसि थोरपणाचि बकसिस केली ।। तरि यांसि योग्य आहे परंतु स्वामी माहाराजा मागां पुढां कोण्हाचि काये गत होईल आणि कोणकोण कोण्हे पदासिं पावतिल ।। तरि आमची विज्ञापना की बहुमाना विसी चौघालियां मागे यास बहुमान करावा ।। राजसभे मध्ये व विवाहि व मोहोत्सावी व शोमनिं बहुमान करावा ।। परंतुं येक आह्मि मागोन घेतों स्वामीजवंळ की जर आमचे वंशिचा कदाचित कोण्हि हे विद्या अभ्यासिल कदाकाळानुसास जालें तरी यांचे वंशिकीं गुरुदक्षणा न मागावी ।। आणि तो त्या कुळिचा ह्मणोन त्यासि बहुमान करावा ॥ कां जर पुर्विल बहुमान प्रमाणे वर्तणुक करावी ।। कां जर धर्मशास्त्रि स्मृति–महांर्णविं निर्वाह आहे ॥ ऐसा कीं राजश्री प्रधान कुळगुरु असतां पुरुषं याणे कीं कोण्हे हि कडोन कोण्हे ही विद्या अभ्यासिली तरि गुरुदक्षणा न द्यावी ॥ बकसिस भाग्यानुसार द्यावें ॥ विवंचना ।। श्लोक ।। राजगुरु तथा मंत्रि राजवंश नृपोत्तमः ।। न शिष्यत्व कस्यैव गुरुत्वं तस्य विराजते ॥ १ ॥ या स्तवं स्वामी माहाराजि त्या अष्ट पुरुषांसि पाचारोन आज्ञा केलि की तुह्मी आज पासोन कोण्हेके सभे मध्यें बहुमान राजश्री रघुनाथपंत कावळे पैठणकर सरदेसाई राजकुळगुरु व सोमदेशले तपे मालाड व हरदेशले तपें मरोळ हे त्रिवर्ग सर्व सभे मध्यें देशल्यां चौघल्या मागें बहुमान तुह्मास करितिल ॥ हे राजश्री स्वामिची बकसिस ।। या नंतरे कोण्ही जातिचे या प्रांति तहद परनाळा अहद अमलाद जे कोणि सुतारविद्या करितिल ते तुह्मास बैसणपटि व गुरुदक्षणा देतिल ॥ खेरिज देशाये वंश व अष्ट चौघले व कडु पालवण याचे वंशिचा कोण्हि येक तुह्मा जवळ येवोन विद्या संपादिलि अथवा कोण हि विद्या करोन आला तरी तुह्मी त्याचिया पुर्विल पदा प्रमाणे बहुमान करावा ।। ह्मणोन स्वसिक्याने पत्र लेहोन दिधलें ॥ आणि राजश्री रघुनाथपंत कावळे राजकुळगुरु यांचे चरणकमळि परस्परें हात ठेवोन विडे वांटिले ।। हा वर्तमान पुसिल्या प्रमाणे श्रुत केला ।। मग ते राजसभे मध्यें चौघल्या भागां कोळंबा-वंशिक पुरुषासि बहुमान जाला ॥ मग निश्चयात्मक अष्टपुरुषाचे वशिकांसि सांगितलें कीं आज पासोन कोण्हि हे विद्या करितिल त्या पासो बैसणपटि व गुरुदक्षणा घ्यावी ।। तेव्हां हे विद्येस आज्ञा द्यावी ॥ पद्मदेशले व दाददेशले खोति तपे मालाड व तपे मरोळ आणि अष्ट चौघले यांचे वंशिचा कोणि विद्या अभ्यास करिल तरि तुह्मासि त्याचे गुरुत्व नाहि ॥ कां जर हे जाति मध्यें वरिष्ट ॥ प्रथम मान्याधिकार यांचा ।। हे बैसणपटि आणि गुरुदक्षणा न देतिल ।। कां जर स्वप्रजेचे शिष्यत्वास योग्य नव्हे ।। ऐसियासि कोणि स्वभाग्ययोगे करिल तरि धर्मशास्त्रि मयुरग्रंथी सांगितलें असे ।। वचन ।। श्लोक ।। स्वगुरुमान्यहंतारो श्रेष्टश्व मानहंतकाः ॥ एवं दुष्टात्मको नष्टो स्वगोत्रं नरकं पचेत् ॥१॥ या नंतरें सूर्यवंशि राजश्री स्वामिचे वंशिक आणि प्रधानवंशिक सर्व द्वादशगो त्रान्वित प्रभु भानुकुळमंडण यांसि सर्वत्रापि बहुमानासि सर्व सभे मध्यें मुख्यत्वीं निश्चयात्मक आहे ।। परंतु वर्णानां ब्राह्मणो गुरु येदर्थि बोलणे नलगे ।। या नंतर पंतारत सोमवंशि कार्तविर्योद्भव जे आहेत त्यासी भिन्न गंधपात्र करोन गंधार्चन करावें ॥ ते लक्ष्मीविष्णोद्भव आहेत ह्मणोन सूर्यवंश व सोमवंश या दुर्वाघी समागमे सुखें गंधार्चन करावें ।। ते च समंति कदाचित पांचाळ आले तरि त्यासि ही बहुमान करावा ।। आणिक सिंधे शेषवंष ह्मणोन मांडारि आले तरि सुखें गंधार्चन करावें ।। नीमित्य, शकाधिकार ह्मणोन उक्त आहे । यदंन्यायें पांडवि अश्वमेध केला ते समईं धर्मरायानें सभापुजन केलें ।। हे सही ।। हें पुसिल्या प्रमाणे हा लेख केला। दामोदरराव वृद्धविष्णुगात्रि ते सभेस होते।। सही।। देवदेशले सही।। अनंतदेशले सही ॥ आबाजिनायक सही ।। रघुनाथपंत कावळे सही ॥ अष्ट चउघले सही ।। मुख्य प्रधान सही।। हा पंत राजमुद्रा व प्रधानमुद्रा म्लेछार्णव राष्ट्र जालें ते समईं लीहिला ।। सही ।। हा असत्य मानिल तो नरकि पचेल । साक्षयुक्त लीहिला आहे ॥ संवत् १५३५ ।। इति वंशावळि संपुर्ण ।। शके १७४१ प्रमाथिनाम संवत्सरे माहे वैशाख शुध्द प्रतिपदा रविवासरे ते दिवशीं वंशावळिलेख समाप्तः ।। हस्ताक्षर वालजी पाटिल सिंधे शेषवंशि वस्ती वसइं बाहादरपुरा।। हे वंषावळिची पोथी राजश्री हीराजी रामजी राउत सिंधे शेषवंशि वस्ती वसइ बाहादरपुरा यांचि असे।। ।। पत्रे सुमार ।। ६९ ॥