Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

क्षण येक सावध होउनी ।। राव उतरला अश्वावरोनी ।।
सन्मुख उभा राहोनी ।। विनवों लागला ।। १०५ ।।
कवण होसि तूं नागरी ।। सांगे मजसिं झडकरी ।।
कवण तुझा साहाकारी ।। हे स्थळी ।। १०६ ॥
तुं कवणाचि सुंदरा ॥ कीं यद्यपिं कुमारा ।।
हा निर्धार सत्वरा ।। सांगिजे मज ।। १०७ ।।
येरी होति ध्यानस्त । मैान्य प्रकार दृढवंत ॥
सुशिळ आचार्यवंत ।। जपमाळिका ।। १०८ ॥
राजा विचारि आपुले मनी ।।प्रतिउत्तर न बोले कामिनी ।।
राजा विव्हळ कामबाणी ।। ह्मणे कैसें करावें ।। १०९ ।।
की हे आदिशक्तिमहंमाया ।। कि अपसरा देवलोकिचिया ।।
हे बैसलि असे या ठाया ।। काये ह्मणेानी ।। ११० ।।
ऐसा विचार करितां राजयासी । दीन गला अस्तमानासीं ।।
तेथे झाली निसी ।। गुंफेमाजी ॥ १११ ।।
तंव तिये ध्यान विसर्जिलें ॥ दृष्टि राजयातें देखिलें ।।
मग पुसों आदरिलें ।। तयाप्रती ।। ११२ ।।
तुं कवणाचा कवण होसी ।। कवण देशिं नांदसी ।।
या गुंफे केवि आलासि ।। कवणे परी ।। ११३ ।।
येरु ह्मणे मी राजा शोमवंशी ।। हस्तनापुरि नांदतो परियेसी ।।
वह्याळि खेळतां गुंफेसी । आलों येथें ।। ११४ ।।
तुझें लावण्य देखोनी ॥ भुललो असे मी कामबाणी ।।
आतां विनति आईंकानी ।। अनुसर देई ।। ११५ ।।
येरि ह्मणे मी उपवरी ।। भद्राक्ष ऋषिची कंन्या अवधारी ।।
तपस्वि ब्रह्मचारी ॥ असे येथे ।। ११६ ।।
तुं क्षेत्रि मी ब्राह्मणी ।। हा अधर्म केवि तुझे मनी ।।
जें ब्रह्मादिका अमान्य पुराणीं ।। तें केवि घडे ॥ ११७ ॥
रुद्राक्ष ऋषि माझा पिता ।। जो तपस्वि सूर्य जैसा तत्वता ।।
त्याचि मी दुहिता ॥ येथे असे ॥ ११८ ॥