Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
महिकावती (माहिम)ची बखर
मज पाहे ऐसा कवणया त्रिभुवनी ॥ शापें शोषिन मेदिनी ।।
तेथे बापुडें तुं काये क्षत्रि मज लागुनी ।। वरो शकसी ॥ ११९ ।।
ऐसे वचन बोलिली तिक्ष्ण ।। ऐकोन कोपला शामकर्ण ।।
जैसा धृत्तें सिंपिला अग्न ॥ हात घालोन धरली केशी ॥१२०॥
गजबजिली ते सुंदरा ।। हा हा शब्द वदली अवधारा ।।
तापसि महागंभिरा ।। शाप वदलि दारुण ॥१२१॥
तुं होसिल अंधककुब्ज ।। निर्वेश जाईल सहज ।।
पुरुषत्व नाहि तुज ।। अमंगळ पापरासी ॥१२२ ॥
ऐसे शापवचन जाले । तें ततक्षणि फळलें ।।
ऊशाप मागों आदरिलें ।। शाम कर्णे तये वेळीं ॥१२३ ॥
कोटि ब्रह्मकंन्या उद्यापन ।। द्रव्यद्वारि कंन्यादान ॥
चतुर्विश वरुषे या पर्वति स्थापन ।। वास करिसी ॥१२४।।
मग निसी क्रमिली ।। सूर्यप्रभा फाकली ॥
राया सेवकासि साद घाली ।। तें आले ततक्षणी ॥ १२५ ।।
मग राजा तेथोन उचलिला ।। मुखासनि बैसविला ।।
हस्तनापुरासि आणिला ।। अंधकुब्ज ।। १२६ ।।
आश्चर्य केलें सकळीं ।। काये जालें वनस्थळी ।।
वृत्तांत सांगितला सकळी ।। प्रधानर्वगासी ॥ १२७ ॥
आईकेनि वृत्तांत ॥ द्विजकुळासि केला आमंत ।।
ऊशाप सांगितली सर्वा प्रत ।। ऋषिकंन्येचा ।। १२८ ॥
जेथें कंन्या असे उपवरी ।। त्याणे द्रव्य न्यावें मंदिरी ।।
पुण्य मज लागि अवधारी ।। दिधलें पाहिजे ।। १२९ ॥
या परि कोटि उद्यापनें केलीं ।। रायासिं दृष्ट आली ।।
मग प्रयाणा उतावळि ।। केली राये ॥ १३० ॥
प्रयाण केलें कोटिपर्वती ।। प्रधाना समवेत विप्रमूर्ती ।।
जावोन राहिले पर्वतीं ॥ चतुर्विश वरुषें ॥१३१ ॥
तेथे देवालय बांधिलें । कोटि यज्ञ केले ।।
रायाचें शरिर दृढ जाले ॥ दिव्यरुप ।। १३२ ॥
मग ऊशाप जाला ।। कुळि पुत्र उपजला ।।
नाव काळकोट ठेविता जाला ।। रायें तयाचें ॥ १३३ ॥
त्या काळकोटा पासुन ।। वंश वृद्धी पावला जाण ॥
ते समुळ सांगेन ।। आईका आतां ॥ १३४ ॥