Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

तें प्रगट असे।। ब्रह्ममुखिं वसे ।। राजकुळांस शस्त्रस्वरूपि रक्षित असे ।। जे येकभावे आईकति त्यांचि पापें विलया जाति ।। वंशउत्पति आईकतां पुण्यपावन होति ।। निपुत्रिका संतति ।। नेत्र अंधास येती ।। अज्ञान भ्रांति फिटे ॥ मज अभिमान कुळाचा ।। धर्म रक्षावा साचा ॥ नायकोराव देसला मालाडचा ।। त्याणे मज केशवाचार्यास नेऊन सर्व आसवर्गिक व देसक व मांडळिक यावत् केळवें पासुन मुंबैई परियंत मुख्यमुख्य गावोंगाविचे जातिजातिचे गोत्रिगोत्राचे खलक जमा तीन हजार सासें पंचावन्न गणति येकवीस दिवस परियंत माल्हजापुरि योगेश्वरि स्थानकि मंडप रचोन जमाईत तेथे महाप्रेत्न मनुष्य पाठवोन बोलावणि करोन समुदाये ब्राह्मण खलक संख्या पांचसें येकवीस नायक देसाये प्रोहित कुळगुरु आचारे उपाध्ये जोशि वृतिवंत देशस्त या उपर गोवर्धन गंधर्विक ते हि सर्व मेळविले ॥ नायको-रावें फार सन्मान करुन सर्वांस यथामहत्वें फार, आतिथ्य करोन सर्वांस सुखि केलें ॥ समुहुर्ति दीवस ठराव केला होता त्या दिवसि हा प्रयोग वंशावळिचा केला ॥ जर मुख्य वडिलांच्या किर्ती ।। हा देश यावत् दवण पासोन श्रीमुंबै परियंत काबिज करायास राजा प्रतापबिंब दाहा सहश्र घोड्याचि फौज घेवोन अहिनळवाड्या होउन येउन हा देश काबिज करून राज्यधाम श्रेष्ट माहिम देश घेतल्या वर जागोजागी आपले स्वसमागमिक सेनायिक बैसविले ।। जाहागिरा वतने वृती ईनाम सर्वांस यथामहत्वें दिधल्या ॥ त्या आज पावे तों चालतात व पुढें ईश्वर आपलें वंशिकासिं चालविला।। परंतु येक मनि भाव जाला ।। जर येक दिवस अवघ्यां देशाईक या देशि समुदाई मिळवोन नवसभोजन देईन ।। हे ईच्छा मनी उत्पन्न होतां श्रीकुळस्वामिणीन स्वप्न दिधलें जर मनिचा हेत मी पुरवितों ।। तुं सर्व जे पुर्वि आले व या साशष्टि पासोन दुसरे केळवे परियंत फांकले आहेत त्यांचा समुदाये करुन येक वंशपत्र करणे ॥ हें स्वप्न मज केशवाचार्या मुखि आपण नायकोरावें साष्टांग सभेस घालोन सांगविला।। हे सर्व विप्र व देशिक देखोन व आईकोन जयजयकार उदो बोलिले ॥ समस्त उभे राहिले ।। विप्रवर्गि लक्ष्मीसुक्तीं दुर्गा योगेश्वरि भगवति स्तउन नायकोराव देसला देशकि आळंगुन विप्रि आशिर्वाद दिधला ।। जर तुं मला सोमवंशि धर्मवंत उदार प्रौढिप्रतापसागर, जर तुज देवि प्रसन्न जालि, हें कर्म वंशिक पध्यतिचे, तु जवळ होउन सर्व समुदाय मेळउन, जुने खते आज पावे तवं हिसाब पाहातां बिंब प्रारंभा पासुन वरुषें तीनसे जालिं ।। या मध्यें हे राज्यकुळ खल्लक सैनिक ईनामक सर्व रईत अजम सेक आलावदिनाचि जालि ।। या उपर देसा मध्यें ते हि बहुत यवन जाले ।। राज्य अभिमान सांडला ॥ शस्त्रें सोडली ।। कृषि धरिली ॥ सोमवंशिं कारकोणि गांवखोति ताडमदिरेस उदिम धरिला ।। सिंधि काहिक असति धरोन आपलि वतने ।। काहिक सेवा करुं लागले ।। काहिक नष्टले ॥ बहुत आचारहिन जाले ।। बहुत गोत्र प्रवर कुळस्वामिण कुळगुरु ठिकाणे सांगतां विसरु लागले ॥ जाणोन देविने धर्म माहाराष्ट्र रक्षाया कारणे राजश्री नायकोरायास स्वप्न दिल्हें।। जर हा जाति मेळवा करावा । आम्हास ब्राह्मणास भूदेव प्रसिद्ध जाणोन हीं मेळवावें ।। तर हा आशिर्वाद आमचा ।। श्रीदेवि आद्यशक्ति जगदंबिका ।। माहाराष्ट्रधर्मरक्षिका ॥ तुम्हां सुप्रसंन्न असो ।। श्रीरस्तु ॥ हा आशिर्वाद आयिकोन व केशवचार्याचें वचन ।। स्वधर्म रक्षणार्थ श्रीदेविचें स्वप्न ।। तीन हजार मासें छपन्न सर्व जे राजकुळि सैनिक मिळाले होते त्याहि फार ब्राह्मणासि पहिरावण्या दक्षणा दिधली ।। ते येकयकांचि नावें सांगता ग्रंथ वाढेल ।। परंतु अवघि द्रव्यसंख्या च्याळिस हजार दाहा बोळी धर्म जाला ।। शतचंडि नायकोरावें करायास संकल्प केला व प्रणाम्य करून सर्वांप्रति विनविलें जर कृपा करुन माझें मानसिक पुरें होये हें करा ।। ते समई सर्व देशक म्हणो लागले जर तुं धर्ममूर्ति तुझेनि योगें हें कार्ये पावेल सिद्धी ।। या प्रयोगास विनविजे प्रथम कुळगुरुतें ।। जे वेदमूर्ति ऋषिवर्य आंबनायक कावळे आचार्य जोशिक वृतिवंत तुमचे ।। हा मान्य देसला काननायकरावाचे गुरुस दिधला ।। त्याणे धौंडि नायक सांडोरे कुलगुरु शेषवंशिकाचे वतनदार पसपवलिचे तयां नमस्कारिलें ।। व हे श्रेष्ठ आम्ही विप्रांत म्हणितले ।। जर हे ज्या स्थळि असतिल त्या स्थळिं प्रथम मान्य टीळा सांवखेडकरांस ।। त्या खालते कावळे ।। उपर आचार्य मग ।। ईत्यादि संप्रदाये ।। ऐसा हा निवाडा सांगितला ॥ तो सर्वांसि मानला ।। साक्षेसिं प्रतिपदिला ।। समंतियुक्त ।। यो उपर नाईकोराव देसला ।। आपुल्या समुदायासिं बोलता जाला ।। जर प्रथम मान्य देसल्याचा ठाकुर-वर्गी ।। उपर रुत आधिकारि ।। ते हि तत्समान मान्य आधिकारि ।। टीळा घेतिल निर्धारी ॥ आदरें करोनी ।। या नंतर चोधरि चुरि ॥ ते हि टिळयासिं आधिकारि ।। भागडचु-याचे गोत्रि ।। म्हणोन आधिकारी ॥ मग म्हातारपक्षी टिळा ।। यासि मान्य दिधला ॥ राउत कुळिं लक्षिला द्यावया लागि ।। तेधवां सवे बोलते जाले ।। जर वर्तकिपद आह्मासिं चालोन आलें ।। टिळा आमचा म्हणितलें ।।