Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

तें आईकोन नागरसें आंधेरिकरांला छत्रि दिधली ।। वारने वांदरें नावा जिले।। त्यासि हि छत्रि दिधली ॥ साहारकरांला आणि पालवणकरां हात सांकळ्या पावले ॥ त्या उपरांत देसलिक हादपुरोचा बंधु सोम ठाकुर देसला जाला ।। मालाडि प्रवर्तुं लागला ।। आणि मरोळा कान्हा ह्मातरा त्याचा पुत्र कुंडम्हातरा देसला जाला ।। हे देसले मालाड व मरोळा प्रवर्तुं लागले ॥ त्या उपर त्या नागरस्यान जैतचुरी बोलावोन आणिला ॥ धर्मपुत्र म्हणोन दळाचि नाईकी दीधली ।। आणि येसावें चौफेर बंदरकी ते ही प्राप्त जाली ।। जैतचुरी वेसावें आपुलें मत्तें प्रवर्तुं लागला ।। या उपरांत दील्लिचा राजा दिल्लेश्वर तेथे तुर्क अवतार म्लेंछ जन्मला ।। तो गोवळा होवोन प्रवर्तु लागला ॥ तो कैसा वंशवृद्धि पावला कवणे परी ॥ द्वारका नगरी गुजराथ पदरी नगरसेठ विठलदास ।। वर्ण वैश्य ।। गणेश उपाशक ॥ त्यास संतान नाहि म्हणोन सर्व देशिचे ज्योतिषी विद्यार्थि बोलाविले ॥ अतित संन्यासि सर्व जमा जाले ।। पृछा सेठान केली ॥ जर काहिं उपदेश पाहावा जेणेकरोन पुत्रसंतति होये।। यैसा प्रस्त्र आरंभिला ॥ तेधवां धर्मशास्त्र पाहिलें ।। सोमयाग आणि ठाकुरजीचें देवालय बांधावें ॥ यैसा निर्वाह सांगितला।। तो विठलदासास मानला ॥ त्या उपरांत वर्ताळा केला ।। तेधवां म्लेंछ उत्पन्नता सांगितली ॥ जर दिल्ली मध्यें सुलतान उपजला आहे ॥ तो पातशाहि करिल ॥ तेधवां धर्म लोपेल ॥ देवालय भंगिल ।। राजे देशोदेशिचे शरण म्लेछांसि होतिल ॥ म्लेंछधर्म वृद्धी पावेल ॥ कलयुगभाषित भविस्यार्थ आहे ॥ यैसि वाग्वाणि आईकान पृछा पुन्हा सेटे केली ॥ जर यासि येत्न पाहिला पाहिजे ॥ तर आपण दील्लिस जावोन त्या सुलतानखत आणितों जर देवालय चिरायु राहेल ।। ह्मणोन द्रव्य उटें च्यार घेवोन विठलदास द्वारके होवोन दिल्लिस गेला ।। पृछा आदरिली जर सुलतानका डेरा काहां ।। पुकारित जात येक खेापटि देखिली ॥ त्या मधोन ह्मातारि वृद्ध आलि ।। विचारों लागलि जर सुलतान माझा बेटा ॥ तुम्हासि काय दरकार पुसाव याची ॥ आईकोन सेट बोलिला जर त्याचिं भेट घेणे आहे जरुर ।। त्या योग्य काम जाणेान आलों आहे ।। ती म्हणो लागलि जर सुलतान गोवांरे घेवोन चारायास नेलें।। त्यासि गोठणि भेट होईल।। तेधवां त्या म्हातारिस समागमे घेउन गोपचारा पाहित गोठणि गेले ।। तेधवां त्या सुलतानें काये आरंभिलें तें ।। आपण धोंडि वर आसन घातलें आहे ।। मोवंळे चौफेर उभे केले आहेत ।। बोलणे मंजुळ दृष्टि कुर्म पाईं पद्म शुभलक्षणें मंडित ।। विठलदासें देखोन मनि गांठ घातली जर हा छत्रपति होईल ।। तेधवां संटे अर्ज केला ॥ जर मी मागेन तें दीधले पाहिजे । तें आईकोन सुलतान बोलता जाला ।। तर आम्हि गोवंळे पशु राखावीं ॥ आह्माजवंळ काये आहे तें तुमचें ॥ जाणोन मागणे नलगे ।। आह्मा आज्ञा प्रमाण ।। मग सेट बोलता जाला जे तूं आज गोवळ परंतु पातशा होसिल ।। राज्य पृथ्विचें करिसिल ।। तरी येक माझें मागणे ।। जर आपण देवुळ द्वारकेस बांधितों ॥ ते कोण्हि भंगावें नाहि ॥ यैसें खत तुज पें मागतों ॥ तें दिधलें पाहिजे ।। मग प्रतिउत्तर केलें ।। जर माझे देणे या युगांत चालेल तें देतों ।। तर देवालय सुखें बांधावें ।। परी आकार वरि मसिधिचा करावा ।। जे दुसरे पातस्याहि होतिल ते हि पाळितिल ।। यैसें आपले हातिचें खत सेट विठलदासास दीधलें ।। मग त्या वाणियान सुलतानास द्रव्य उटें दोन दीधली ।। आपण परतला ॥ द्वारकेस आला ।। देवालय बांधिलें ॥ उपर सुलतान घरि आला ।। द्रव्याचि गणित पाहिली ।। द्रव्य ८ लक्ष हुन जाणोन हर्षला ।। आपलि ज्ञात जेथे होति तेथोन बोलावोन जमा केली ।। ५ सहस्त्र जमा जाली ॥ त्या उपरांत येक दिवस राजा दिल्लेश्वर पारधिसिं गेला ।। दळ सवें गेलें ।। तें देखोन ईश्वरि इछा शक होणार ह्मणोन सुलतांन चढाये केलि ।। जावोन किल्ला घेतला ।। रायासि कळलें ॥ तेथें युद्ध जालें ।। राजा मारिला ॥ या परि पातस्या सुलतान तकतिं बैसला ॥ पातस्थाहि करों लागला ॥ त्यासि पुत्र जाला ॥ नावं सुलतान आलावदिन नाव ठेविलें ॥ त्याणे निकामलिक वजिर केला ॥ त्या उपरांत दिल्ली होउन भाट कोकणि आला ॥ माहिमा राजा नागरशा त्यासि देखोन, पातस्या जीवें, सुलतान आलावदिन ॥ पद वाने वाखाणिलें ।। तें आईकोन त्रिपुरकुमर कोपला ।। ह्मणे हा दुर करावा ।। नासिक छेदावें ॥ ग्रामा बाहेर देशि हाकलावा ॥ तो अपमान पावोन भाट दिल्लीस गेला ॥ जावोन पातशासिं अर्ज केला ॥ पातस्या जीवें, कोकणि अपेश पावलों ।। तें देखोन आलावदिन कोपला ॥ मग निकामलिक पाचारोन हुकुम केला हिंदु चढ्या घोड्यासिं फत्ते करावें ॥ राजे दक्षणेचें घ्यावें ।। सवें दळ घोडे १२०० फौज चालिली ।। अमदाबाजीस आले ।। चापानेर पाटणी राजा जयसिंग त्याचे राज्ये घेतलें ।। ते हि समागमि घेवोन कोकणि आला ।। कळब्या पावला ।। तेथोन ठाणे काबिज केलें ।। तेथें युद्ध थोर जालें ।। तेथोन सिवां उतरला ॥ माहिमास गेला ।। तवं राणिने गलबला आईकिला ।। सेवक रायासिं पाठविला ।। वाळकेश्वरि राजा गेला होता ॥ मग राणिन युद्ध केलें घटिक १०॥ समरंगाणि राणि पडलि ।। मग राउळ लुटिलें ॥ तेथोन भाईखळ्या येतां रायासिं भेट जाली ।। भाईखळ्या युद्ध जालें ॥ तेथें राजा मारिला ॥ राजा राणि मारिली ।। निका मालिकें राज्य घेतलें ।। मग तेथोन निका मलिक परतापुरि आला ॥ राउळ उत्तम देखिलें ॥ तेधवां जैतचु-याचा पुत्र भागडचुरि प्रथम निका मलिकास भेटला ।। देसाची जमि सांगितली ॥ माहाले प्रगाणे खापणि गावे वोळी ।। हवाले मसाले हाट बखाल आदाय खर्च ।। सर्वे निका मलिकास सांगितलें ।। तें आईकोन निका मलिक मेहरवान होउन भागडचुरि हुजुरमजलसि-पद दिधलें ॥ मग निका मलिक परताबपुरि राहिला ।। मग तेथोन पत्रें दिल्लीस पाठविलीं ।। खबर दिधली ।। जर कोकण घेतलें ॥ तेधवां निका मलिकाचा बंधु मलिक आलावदिन नामजाद केला ।। त्यास हि कोकणि पाठविलें ॥ तो ठाण्यासिं आला ॥ निका मलिक बंधुसि भेटला ॥