Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

मग ब्राह्मण धांवले ।। विराणे फोडिले ।। त्या उपर देसला अपुले गाविं आला ।। उपरि वरि बैसला ॥ चहुं गाविंचे मिळोन काहाळा वाजविल्या ।। सोळासें वोडणखांडे मिळाले ॥ देशांत लुट करों लागले ।। तें देखोन पहाडकरि ब्राह्मणि वारिले ।। जर जो खर्च होईल तो आम्हि देवों ।। त्या उपर हेर घातली ॥ तर भागडचुरि हरबादेविचे यात्रेस गेला होता ।। ईतक्यात पाहाडकरि चु-यास निरोप पाठविला ।। दादरुत गावांस आला आहे ॥ जमा लोक मिळाले आहेत ।। म्हणोन तुह्मी दाडिये सुखासनि येतां हुशार होणे ।। या उपर चहु गाविंच मिळोन बाहुटा उभारिला ॥ जर जे भागडचु-या सर्वे असतिल ते गांवा खेरिज ॥ अवघ्या हि देसल्या दादरुता जवंळ यावें ।। न याल तर देसा खेरिज ।। तेघवां मालवणिचे तटाकी वेंटनाईक स्वयंपाकी होत।। बाहुटा आईकोन च-हविया टाकोन लोक सारे दादरुता कडे मिळाले ॥ भागडचु-याचे सवें राहिले नाही ॥ जे स्वांग जिवाचे होते १२० तीतके राहिले ।। मग भागडचुरि पांचंबा देविस आले ।। द्रुष्टाद्रुष्टि जालि ।। सीमल ह्मातरा सन्मुख होवोन भागडचुरि हडकिला ।। तो हि साउमा जाला ।। दोघांचे दळ दोघांचं पाठिस राहिलें ।। पूर्वपश्चमे जालें ।। पट्याचे हात दाखविले ।। भाग डचु-यान वार केला ।। सीमल ह्मातरा उत्पवन होउन घाये चुकविला ।। काळवटा पावला ॥ तैसा च पट्याचा मीरका हाणितला ॥ भागडचुरि घायाळ होतां आदळा-आदळ जाली ।। आरोळि फुटली ॥ त्या च वेगेसा जण अंगलग भागडचु-यास घेवोन निघाले ।। ते सीमल ह्मात-यान देखिले ।। मग पाठि लागले ॥ तवं भागडचु-यासहित काररडाह्या पावले ।। उड्या डाह्यांत घातल्या ।। तवं सीमल ह्मातरा तो हि पावला ॥ तवं हे अंतरले ॥ तेधवां त्या डाह्यात तारु होते ।। त्या तांडलास सीमल म्हात-यान हडकिलें ॥ जर तो निळे पगडिचा भागडचुरी मारिसिल तर जें तुं मागसिल तें देईन ।। आईकोन तांडेल बोलिला जर आपली कंन्या देसिल व जातित घेसिल तर मारिन ।। आईकोन सीमल ह्मातरा बोलिला जर तुला जातित देसल्या जवंळ सरता करिन आणि कन्या हि आपले कुळि देईन ।। सत्य वचन दिधलें ।। मग त्या गोमतांडलें पालकोईति हाणितली ।। ती वर्मि भागडचु-यास लागलि ॥ तेणे गजबजिला ॥ तवं तो गोमतांडले उडि टाकोन चुडावल्याचा मारिला ॥ ऐशा परि भागडचुरि मुक्ति पावला ।। आणिक दाहांतिल येक मारिला ॥ नव जण पार झाले ।। ते वेव्ह्याळि उतरले ।। मुडध्यास जावोन मायेंदरसवां धरुन जुहां उतरले ॥ तेथोंन नागाव्यांस आले ॥ तेथोन वर-दक्षिणीस आले ॥ तेथें माधव माळि त्याणे त्यांचें आथिथ्य विशेष केलें ॥ त्यासिं विचारिलें तुह्मी कोण कोणाचे ।। त्यानीं मुळकथा सांगितली ॥ भागडचुरि मारिला ह्मणोन आह्मास येणे जालें ।। तरि येक विनंति आमचि जे आमचे कबिले राहिले ।। तेधवां त्या माळ्यान आपला पुत्र पाठविला ॥ तो जावोन कबिला आणि कमळचुरि घेवोन रात्रि आ-यास येवोन डोंगरवाटे चेन्यास आले ।। तेथोन मसुफोफळी उतरोन घरि आला।। कबिले भेटविले।। वस्त्रें फिरविली ।। मोति स्त्रियांहि टाकिली ।। पुरुषाहि द्वालि सोडिली ।। माळि वेश धरिला ।। उदिम माळियाचा सिखों लागले ।। माळिवें कमळचुरि आपला कबिला घेवोन पैलाड उतरोन केळव्यास गेला ।। तेथें दामकवळि हाटवट्यान राहिला ।। वाडिया लावल्या ।। त्याचि परंपरा तेथे जालीं ॥ या उपर नाम मावा भागडचुयाचा भाणज ।। तो आगाम राय-भाट तेथे घरताचा आणि ह्माता-याचा संग धरोन राहिला ॥ त्याची परंपरा तेथे जालि ।। या उपर त्या माळियाचा सोहिरा कवळि तो आळवाडिये तेथे निंजंग भागडचु-या जावोन मलिक आलावदिनल भेटोन वाडिया १० खोति आणिल्या ।। वीस हुन दिवानि द्यावे ॥ यावत मुक्तेश्वर खोति आणिली ।। आपण तेथे कुटुंबि दाद राउत माल सावा दाम राउत गोविंद ठाकुर आणि नार घरत अवघे येकत्र राहिले ।। त्यांचि परंपरा मोहोरे सांगेल ।। छ ।। छ।।