Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

माहाजना लागि ।। राउति पुर्वपक्ष केला ।। टिळा साक्षेसिं घेतला ॥ उपर सव्यासिं दीघला ।। साक्षयुक्त ।। या नंतरें घरथ ।। जे टिळयाचे विभागिक ।। उपर कवळि माळि जात ।। आणि पठ्यार भोईर विर रक्ती भठारी महंत जात ।। समुदाय पावति ॥ ऐसा निवाडा जाला ।। सोमवंशि टिळा संपादिला ।। मग शेषवंशि आदरिला ॥ टिळा द्यावया ।। तेधवां सांवखेडकर कुळगुरु तयाचा ।। जे वंशि अधिकारी त्याहिं आपला गुमस्ता पाचारुन टिळा द्यावा ह्मणितलें ।। तेधवां गुमस्ता देव उपाध्या कंचोळे घेवोन संनिध जाला ।। शब्द सिंधे समुदायांस केला ।। टिळा घ्यावा ह्मणितलें ।। प्रथम चोधरि घारोडकरि ।। जे टिळयाचे अधिकारि ।। त्याहि आपले वर्गि ।। टिळा घेतला ।। या नंतर गोपाळराव ।। तयासि केला गौरव ॥ गव्हाणकर दुसरा आपला संप्रदाय ।। टिळा तयासी दिधला ॥ राउतराव पद पाटेल ।। उपनावं थेवखंडकर ।। हे आधिकारि तृतिय मान्य सत्वर ।। आपले समुदायें घेतला ।। या नंतर पांचघरे यांसि ।। चतुर्थ मान्य परियेसि ।। पांचवा मांडवगडकरांसीं ।। ते राउत ।। सावा मान्य वरातदारि ।। घेति साक्षसी झडकरी ।। कडु त्या खालते सातव्या मान्याचे अधिकारी ॥ पद पालवण त्यांचें।। आठव मान्य ठाकुरांसि ।। उपनावं नारतळें यांसि ॥ ते घेति साक्षेसि ।। सभेमाजी ।। त्या नंतर तारे पुरो राणे ।। हे मुख्य अधिकारि त्याचा मान्ये ।। ऐसि शेषवंशि खुमे संपादणि जाली ।। या नंतरे ईतरे जे काहि होते त्यास हि मान्य दिधला ।। समस्तें विनंति करोनी आपलें स्थळातें हंकारिले ।। तेथें खतें मझर लिहिले ।। देशोदेशि दीधले ।। जातिसमुदायें आपुलाले वर्गि घेतले ॥ हा निवाडा माहाळजापुरि जाला ।। तो सर्वांसी मानला । नाईकोरावे आपले मझरी लीहिला ।। हे सहि ॥ छ ।। मझर लेख हस्ताक्षर ॥ केशवाचार्य दप्तरकलमि चतुर ।। या हस्तीचे पट लेहविले ।। यक बाबत श्रीमहिबिंबसूत प्रतिबिंबसंमत्तें पूर्विचि राजसिकेचिं अष्टप्रधानसंमतें श्रीकुळगुरुचें हस्तलेख त्या तालुका प्रमाणे राजपूर्वि वर्णण तैसे च रिती व नुतन अनुसंधान सर्व वरिष्ट वर्गिक अनुमत्त प्रेाहिताचें संमत ।। या प्रमाणें खते मझर नावं प्रसिद्ध हेमांडपतिलिपिचे लेख स्वामि मुलकाधिकारि यांचे आज्ञेन पंडित समुदायि संमत्तें करुन जे जे जयांचे आद्यपुरुष आले तयाचें नामा पासुन ज्या पेढ्या भरल्या या देशिं व जीं घरें जालीं यका पासून येकेक तयांचि नावें आद्य करुन व किति घरें वंशिक कोठे कोठे तयांस ठीकाण वास काय उद्यम पोटभरि करितां घेतला तो ।। कैसा आचार करावा ।। काये व्रत आचरावें ।। कोण वृति वर्तावें ॥ उदरपूर्तिस कोण वेव्हार करावा ।। लग्न विवाह सोहिरिका कोण कोण गोतिं संपादाव्या ।। कोणाचि कोण्हि आणावी ।। कोणास कोण्हि द्यावी ।। जैसे हें देसा मध्यें संपादतें तैसें येथे यथानितिन संपादावें ॥ अपेश उणे वंशास येउं न द्यावें ॥ अकर्म जालें ह्मणजे सत्वर कुळगुरुस सांगावें ॥ तो सर्वां स्वकुळमंडळिक त्यांस श्रृत करिल ।। जर हें यैसे अनृत्य यका पासुन घडलें तर यथाशास्त्र धर्ममार्ग कर्मकांड जो ज्या दुष्कर्मास प्रायेश्चित घटे तें तीर्थविध साधावी ।। प्रायेश्र्चित या रीतिनें द्यावें ॥ येवढा देवदंड ।। येवढा राज्यदंड ॥ येवढा जातिदंड ।। देवदंड किदृष तीर्थविधकर्मयुक्त ब्रह्मभोज्य गोदान गुरुपूजा अळंकार भूषण ।। राज्य दंड कीदबा ॥ जे ग्रामि कर्म वर्तलें तेथे जे ब्राह्मण अतित आभ्यागत आगांतुक त्यांस राजा आपले सत्तेकरून त्याचा विभाग शास्त्रसंमतप्रमाणे तो यांप्रति धर्म करववितो ।। जातिदंड किदबा ।। जातिस विभाग द्रव्य येईल त्या प्रमाणे कोण्हि भुभुक्षित वृद्ध ॥ किंवा मृत्युसुतक ।। विध्वा ।। अबळा अनाश्रय तयेस ।। कीं उपवरि तयेस ।। की ग्रहतटाक ।। कुप व पंचब्राह्मणभोजन ।। या रिति जें द्रव्य येईल त्याचा व्यय अध्यान संपादावा ।। व आध्यानजातिवर्गींचे तयांहि त्या समागमि भोजन संपादावें ॥ यास पांच-ब्राह्मण-भाजन वैश्वदेव साक्षेसि ॥ हा अनुक्रम पुरुष वृद्ध ॥ त्यां पासुन ज्या पेढ्या भरल्या त्या व तयाचें गोत्र ठीकाण वतन येथिचे राजदत्त प्रवर कुळस्वामिण कुळधर्म कुळगुरु यैसि खतें वर्णवर्णि गोत्रगोतिं मझर लेहोन सर्व अनुक्रमे संपुर्ण पंडिती वाचुन सर्वास आयेकउन अधिकनुतन काहि नाहीं पुरातन सत्य प्रामाणिक लेहोन सर्व साशष्ट मझर येकेक कुळाचें करुन अवध्या ही रुजु साक्षे सीके प्रमाणक वाचोन, समस्तां मान्याधिकारि जे ज्या ज्या कुळाचे तयांस दिधलें ।। त्याहि शिरी वंदुन गणपतिपुजन करोन आपलेपासि ठेविलें ।। यैसिं खतें महजर नायकोरायाचे प्रसादें सर्वांस जालीं ।। ते समईं हे वंशपद्वतिलेखा संमत देउन वेदमूर्ति विप्रकुळिं ब्राह्मणसंख्या पांचसें येकवींस मुख्य मुख्य धौंडि नायक व तथा आंब नायेक याहि समस्त विप्रमेळा यांसि स्वमुखें म्हणितलें ॥ जे तुह्मी सर्व वृतिवंत वृति चालविता अष्टाधिकार तुह्मास आहेत ॥ तर नुतन-राज्ये-समागमिचे विप्र ॥ व पुरातन यादेशिचे स्थळ-गुरु यजुर्वेदि गोवर्धन व गंधर्विक ।। तर यांस सत्ता ।। स्थळीं घटिका पाटा अंत्रपट गौदानमोक्ष पुजनमात्र कर्मकर्मादिक याहि संपादाविं ॥ यांस हे सत्ता स्थळगुरुत्वाचि ॥ हे कोणाच्यान अमान्य करवत नाहिं ॥ व जे अमान्य करितील व वृतिलोप करितील तरी कर्ता व करविता उभये येमपुरिस जातिल ॥ जे ज्या स्थळिचे स्थळगुरु त्यांस त्यां स्थळि लोक वसति त्यांहि त्याचे हस्तिं कर्मे संपादावीं ।। निर्विकल्प तर तीं कर्मे उत्तम सांग होति ।। नाही तर अकर्मदोष पदरिं पडे ।।