Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
महिकावती (माहिम)ची बखर
हें खरें च साक्षेस येतां लोहिक यांस जे त्या कढय मध्ये प्रवेश करवावा ॥ हा शब्द सर्वांस मानला व राजयाचे चित्तीस आला ।। लोहोक्यांहीं मानिला ॥ ते समइं सर्प आहे घटा मध्यें हे लोहिकि यांचे गुरुन बोलिलें ।। ते राजयाचे चित्ती आलें ॥ व राजयान राणिस अवलोकिलें ।। उभयता समजलीं ।। राजयान श्रीशंकराचार्यजि यां प्रति ह्मणितलें जर आतां तुह्मी सांगा ।। कीं सांगितला शब्द खरा करा ॥ तर वृतिचे स्वामी ।। हें आइकोन श्रीशंकराचार्य हिरण्यशुक्त ह्मणोन अक्षता घटा वर टाकिल्या व आपले मुखवचनि श्रावकगुरुस पुसिलें जर या घटांत काये असे ॥ तरी तो ह्मणे सर्फ फणिधर कृष्ण असे ।। हें आईकोन राजयास व राणिये प्रति व समस्त प्रजे प्रति ह्मणितलें जर लोहोकें असत्य ह्मणितलें ॥ घटामध्यें नवरत्नाचा हार असे ॥ हें आईकोन राजाराणी विस्मित जालीं ॥ ते समइं श्रीशंकराचार्यीं ह्मणितलें जर भूदेव वचन खरें घट सोडुन पाहावें ॥ राजयान आज्ञाशब्द ह्मणितला जर तुझी घट सोडावा ॥ सत्वर सोडिला ॥ मधुन नवरत्नखचित हार काढिला ॥ सर्व जनि देखतां जयजयकार जाला ॥ राजाराणि फार संतोषली ॥ येवोन चरणि लागलीं ।। शंकराचार्ये अस्वासिलीं ॥ सत्वर राजसत्तेन सेवकांस आज्ञा केली ।। जतीः लोहकें: श्रावकधर्मिक गुरु–समुदाय: तैल कढयेत घालविले ॥ ऐसे दंडस्थानि केले ॥ बहुत राजे शंकराचार्य श्रुद्ध केले ॥ स्वधर्मि रक्षिलें । ब्राह्मण वृति स्थापिल्या ।। वर्णावर्ण भेदाभेद निराळेनीराळे अनुमत्तें ॥ वेदिककर्म विप्रासि ॥ पौराणिकमंत्र व्यांशोक्त क्षेत्रियांसी ॥ तांत्रिक पध्यत शुद्रादि करोन ईतर ज्ञाति अष्टादशपर ।। लोभक प्रलोभक क्षतार यांस ब्राह्मणवचनि कर्म तें मान्य ।। ते शब्दीं देविरुप तयास मानावें ॥ ब्राह्मणहस्ते पूजा ।। पार्थिव विष्णु शिव सूर्य गणपति अंबाघट यंत्र ब्राह्मणहस्तें पूजाविध करावी ।। पूजा आराध्य दैवताचि संपुर्ण मंत्र-पुष्पांजुळी संपादुन ब्राह्मणपुजन करावें ।। आमान्यदक्षणा दानसंकल्प सोडुन ।। विप्रचरणअंगुष्टोदकतीर्थ घेउन ग्रहस्तें अभिवंदन करावें ।। सर्वग्रहि संप्रदा।। त्रित्रीआच्मनि सर्व शुद्ध होतीं ।। येक मासाचें प्रायेश्चित टळे विप्रोदको ।। सामासाचें प्रायश्चित जाये स्थळगुरुचरणोदकीं ।। संवत्सराचें प्रायेश्चित जाये कुळगुरुचरणोदकें ।। तीर्थगुरुचि तीर्थी महिमा ।। स्थळगुरुचि स्थळी महिमा ।। कुळगुरुचि सर्वत्र महिमा ।। जाणुन कुळगुरुस न विसरावें ॥ तयास बहुत मान्य असे ॥ हे कथा धौंडिनायक सांडारे व तथा आंबनायक कावळे याहि मुखवचनि नायकोराव देशाय आद्य करोन ग्रहस्त–समुदाय विप्रसमुदाईकास श्रृत केलि ।। हे आईकोन नायकोराय आद्य करून श्रीकुळगुरु शोमसूर्यवंशाचे व शेषवंशाचे यासी ह्मणितलें ।। जर वरवि कथा श्रुत आह्मास केलि ।। तर सेवट आमची यें गोपवितें छेदिलीं ।। तांडल्या करितां व उभयवंशि वैर वाढुन परस्परें युद्ध करून कुळक्षय केला ।। प्रतापश्या मुक्तेश्वरिं स्नानास जातां आंधेरिस देशक मिळोन मारिला ।। आमचे जातिचीं यज्ञोपवितें छेदिलीं ह्मणोन ।। व पोशनायक स्वामिचे वंशिकाचे चांपानेरी जाउन सुलतान दिनास सांगुन जर कावळयाचा वंश शमला ।। आह्मी भाचे त्याचे ।। त्यासि वृत ईनाम आह्मास पावे ।। या रितीन पत्रें घेउन आले ।। सरदेसाई-पदमदें मस्त होउन दुःकर्में केलिं ।। तीं तुह्मास ठाउकि ।। जाणुन देसक मेळउन त्यास मारिलें ॥ त्याच्या स्त्रिया हि पाहाडिन गृहास अग्न लाउन त्या मध्ये निमाल्या । येक यका बंधुचि स्त्रिस गर्भ ।। आगासिकर गौतम–गोत याचि कंन्या ते माहिमास नळदव याचे गृहि राहिली ॥ तेथे ते प्रसूत जाली ।। तयाचा विप्रवंश हेमटे तेथे असेत ।। यैसि ब्राह्मणहत्या व ब्रह्मस्त्रिहत्या व राजहत्या या आमचे शिरीं जाल्या ।। व पुरो पैकिं राणे पैकि दरणे पैकि प्रभु पैकि सूर्यवंशियांचिं यज्ञोपवितें गेलिं होति तर तुह्मी तयांस मंत्र-उपदश केला व आह्मास नाहिं ।। तर याचा निर्वाह करा।। सर्व ब्राह्मणमंडळिक असा ।। ऋषिवर्य ।। या उपर समस्त कुळादिक ग्रहस्तजात आहेत ।। तर हा आमचा मजकुर नीट करुन दिजे ॥ हें वचन धौंडिनायकें व आंबनायकें नायकोरायाचें आयकोन प्रतिवचन केलें ।। जर पुरातन कसें स्थापायास बहुत द्रव्य पाहिज ।। जातशुद्धतेस ।। कां जर शास्त्र मार्ग ।। द्वादशवरुषें क्रमलीं ।। येक प्रायश्चितास ।। ह्मणजे तो निराळा मंडळिक जाला ।। तर येथे दोहा शता वरुषाचि गणणा जाली ।। तर सत्यमेव आयिकाल तर शैयाद्रिखंडिचे संमतें शास्त्राचे आधारें श्रीशंकराचार्यजगद्गुरुहि जैं कर्म स्थापिलें असे, यावत् श्वेतबंधरामेश्वरा पासुन यावत् काशि व द्वारका श्रीतुळजापुर परियंत, मध्यें देश पुंण्यक्षेत्र, देवांचि दशावतारिक जागा, माहाराष्ट्रधर्माचें स्थान ।। कोटि तीर्थाचें महिमान ।। येथें हा धर्म ।। कल्की नारायण अवतार धरिल।। तेथ परियंत राहेल ।। दुसरे देश केवळ म्लेंछमये होती ॥ ब्राह्मण पंचायतनाचे नावं विसरती ।। येउन याहि देशिं मीसळती ।। व या धर्माचा द्वेष करितील ॥ कित्येक आपले त्या च प्रमाणे होतिल ।। या स्तवं धर्म सुगम शास्त्रधारिकांस स्थापिला तो सर्वीं आईका चित्त देउन ॥