Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

कां जे समई शंकराचार्य उत्पन्न जाले श्रीजगद्गुरु धर्म माराष्ट्राचे षोडशकर्माधिकारी ।। महादेवाचा अवतार ॥ कलयुगांत प्रगटला ।। कारण जन्मेजय-राज्य प्रमादलें ।। विक्रमशकाधिकारि-समयिं यवनिधर्म मुळ पश्चमि रमिदेशि उत्पन्न जाला नुतन ।। अक्षरें भाषा पैराब सर्वभक्षक हा शोध राज्या विक्रमास वेताळें सांगितला ॥ हें आईकोन सभा–मजकुर येक दृढाव केला ।। जर यां वर चाल करुन नी:पा- तावें ॥ हा निश्चये संपुर्ण करुन सैनिक नायक यांस राजआज्ञेन सैन्य मुस्तेद करउन मुहुर्त उत्तम जोतिषी गुरुदिनि चाल करावी हा निश्चये केला ।। यैसें असतां राजा निजधामी सुखशयनि नीद्रिस्त असतां स्वप्न जालें ।। जर तुज तया म्लेंछासि जैत नाहिं ।। व तुह्मी ईछा धरिलि असे तर आक्तं शकाधिकारि याचा येईल तो तुज जिंतिल ॥ हें स्वप्न होतां राजा जागृत जाल्या वर चिंतातुर फार जाला ।। जर हें स्वप्न काये विपरित ।। शीव शीव नामस्मरणि जागृत राहिला ।। पुरोहितास बोलाउं पाठविलें ।। सेवकिं पुरोहितास निरोप दिधला ।। जर राजाज्ञा तुह्मास बोलाविलें असे ।। हें श्रुत होतां स्नान देवपूजा संपादुन नित्यकर्महि सत्वर पुरोहित राजालयिं आला ॥ राजयानं देखतां साष्टांग प्रणिपात करोन आसनि बैसविला ॥ अर्घ्य पाद्यपूजा संपादुन संनिध जाला ।। ते समइं प्रोहितें आसनि राजयास बैस म्हणितलें ।। आशिर्वचन सुक्त उच्चारोन आशिर्वाद दिधला ।। पानपट्या विडे पुरोहितास दिधले ॥ ते समईं पुरोहितें पुसिलें जर किंनीमित्य राउळिं सत्वर बोलाविलें ॥ हें वचनि राजयान पूर्ववर्तमानकथा व रात्रिस्वप्न तें मुखवचनि साकल्य पुरोहिता प्रति सांगितलें ।। हें पुरोहित आईकोन मनी आणोन ज्ञानि पाहोन भविष्य बोळखोन राजेंद्रा प्रति म्हणितलें ।। जर शास्त्रसंमति कलयुगिं सा शकाधिकारि भविष्योतरपुराणिचें ऋषिवाक्य आहे ॥ यास अन्यथा कोण करिल ॥ तर तुह्मा मागें शकाधिकारि शाळिवाहन जाणुन मज दिसोन येतें।। जर निर्माण जाला तर शोधिस वेताळास आज्ञा दिजे ॥ हा शब्द आईकतां च चित्ती राजयान वेताळ स्मरतां च वेताळ प्रगट जाला ॥ राउळिं प्रणिपत्य करोन बध्वांजुळि काये आज्ञा ।। हे विनंति राये आईकोन वेताळास आज्ञा दीधलि कीं ॥ पृथ्वी शोध करावा ।। कोठे शाळिवाहन उत्पन ॥ हेर घेऊन येणे ॥ आज्ञेप्रमाणे तो हेरिस गेला । मागे म्लेंछा वर स्वारिचें पुरोहितें सांगितलें ॥ जर ते पश्चमादसे बहुत राजे आहेत ॥ तेथे फार तयांचि युद्धे परस्परि होतिल ॥ सांप्रत या देशिं न येतिल ॥ सर्वास निर्वाह इश्वरि इछा ॥ ऐसें ह्मणत आहेत तवं वेताळ हेर पैठणा होउन आणिली ॥ शाळिवाहन सेने सहित मुस्तेद तुह्मा वर चाल केलि ।। हें आईकोन दळ मुस्तेद केलें होतें तें ॥ स्वारि ईकडे जाली ।। दोघांचा आदळ जाला ।। श्रीविक्रमादित्य शाळिवाहन हस्तें मृत्य पावला ।। कांहि मध्यें काळ क्रमल्या उपर देविशापें शाळिवाहन अश्वारुढ समुद्रि प्रवेशले ॥ छत्रपतिपद वरुणावति राज्याधिकारि जैदेवराणा यास पद असे ॥ देशोदेशिं राजे आपले राज्य धरोन आहेत ।। यैसें असतां मध्यें लोहोळें श्रावक जती नानकपंथ साबरिपंथ रुमिपंथ तुरकी महमदी ईभ्रमी ईसाइ सिस्त्रछेदक केशछेदक सर्वभक्ष तांत्रिक पध्यत ऐसि मेदिनि याहि वरुषेंशता १२ मध्यें व्याप केला ।। फार अनाचार प्रवर्तला ॥ विप्रांस देवांस विरोधी ।। बहुत जन भ्रष्टविले ॥ ऐसें असतां श्रीमहादेव धर्मरक्षणिक रंडाकोल्हापुरी अवतार घेतला ।। वादि लोहोके श्रावके जती जिंतिले ।। अकर्मि त्यास जिंतिलें ॥ पण केला होता जर जो हारेल तयास तैलाचे कढयेत टाकावें ॥ सोम आपा राजयाचे मदसित घटांत सर्प कोण्हा न कळतां घालुन आछादिला होता ।। राजा लोहोक्या याहि वस्य केला होता ॥ येक राणि द्वीजा कडे व काहि प्रजा ।। सेवट वृति द्विजांचि बुडावी ॥ ऐसा पण जाला ।। राज्यान ह्मणितलें जर जो तुह्मा उभयां मधुन या घटा मध्ये जे वस्तु आहे ते प्रसिद्ध नावं सांगेल व काढुन या प्रजेस दाखविल तो वृतिचा अधिकारी ॥ व त्याचें रुप ईश्वरि ।। तो आम्हास मान्य ।। हें राजवचन सर्वांस मानलें ॥ वेत्रकरिं विप्रांसिं व लोहिकी यांसि सांगितले।। तर लोहिकीं विप्रांस ह्मणितलें जर तुह्मी भूदेव व वृतिवंत पुरातन विद्येची सत्ता अभिमान वेदशास्त्रपरायण तर हें वृंद आज पावे तवं सांगता त्याचि प्रचित आज खरि करा ॥ हें वचन आईकोन जोतिषी विध लग्न पाहातां अंधयोग जाणुन फार चिंता वर्तलि ॥ आपले मंडळिकी विचार करुन दाहा दिवसाचे अवधिन सांगु हा जाब दिधला ।। तो रायास व सर्वांस मानला ।। विप्रास आज्ञा केली ।। येर समस्त येक नेमे देविद्वारि येउन उपोषणि बैसले ॥ तेथे सदा उपोषणे होतां शंकराचार्य अवतार उत्पन जाला ।। त्याणे सर्व विप्रवर्गास अस्वासन दिधलें ।। दाहावे दिवसी आपण समागमे सर्व ब्राह्मणसमुदायिं वेदध्वनि करित राजसभा प्रवेशले ।। राजे आद्येकरुन समस्ती प्रणाम्य करोन बैसकार विप्रास दीधला।।विप्रि वेदघाष सूक्त आशिर्वचनि संपादिला ।। घट शंकराचार्य नेत्रि अवलोकिला।। वेस्त्रधारिं पुन्हा मजकुर केला ॥ ते समइं शंकराचार्य ह्मणितलें जर लोकि प्रथम या सभेंत जे घटात आहे त्याचें प्रगट उच्चार करावा ।। जर तयाचें वचन प्रचित येईल तर आज पासुन वृति तयांस व आह्मास तैलकढय अवलोकणे ।। जर त्याचे शब्दा मागें आह्मि मुखीं म्हणु तें च घटांतुन दाखउं तर सत्य भूदेव स्थाईत अना दिसीद्ध ब्राह्मणवृतिचे स्वामी राजयाचे व प्रजेच श्रीगुरु ।।