Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
महिकावती (माहिम)ची बखर
तेधवां कडु उभे राहिले जर ह्मातारे वृत आह्मि असतां पावतिल कैसी ।। तेधवां ह्मातारे दिवानि मिळेल ।। तेण्हे करोन कडु वांद-यास आले ।। ते वांद-या राहिले ।। यांचे वडिल अधकारि वर्तोन गेले ॥ आणि ये हि अदकारि ।। वानठेकर ह्यात-यापैकिंचे ॥ कडु त्या खालचे ।। यैसा निवाडा पाहातां ।। वृति ह्माता-यास पावतां तया न्याये दोघांचा वेवाद खुंटला ॥ वृति ह्माता-यांस भोगल्या ।। कडुहि ह्माता-यांस वोळगें यावें ॥ आह्मि जेथें नसों तेथे मान्य अदकारांचा कडुवांस ।। या उपर साष्टि मालाड खापणे तेथे देसला सिव ठाकुर त्याचा पुत्र कान्ह ठाकुर ।। देसलिक कान्ह ठाकुरासि पित्यान स्वईछे दिधली ।। तो चालवों लागला ॥ तेधवां होळित सिंधे खेळों निघाले होते ।। छत्र कळसाचें लाविलें होतें ।। तेथे कळ कान्ह ठाकुर देसाय याण्हे पाडिली ॥ ह्मणोन येंरगळकर सिंध्याहि देसल मारिला । त्याचे शुद्धीस उधर राउत गेला होता ॥ तो हि तेथे मारिला ॥ तेधवां पोईसरकर आणि येकसारकर सुड घ्यावया धाविंले ॥ त्यांसि वोलणेकारी वारिलें ।। जर ते सिंधे खांड्याचे पाईक आपण येक विचार करों जर सर्व जमा आजि मेळवों ।। हातेरवट समागमि घेवोन येरगळास जावों ।। आणि कळ पाडों ।। तेथ सुड देसल्याचा घेवों ।। म्हणोन आपले खलकें मुस्तेद जाले ।। छत्रि निशाण सवें घेतलें ।। मालवणिसि गेले ।। तेथे निशाण उभारिलें ।। खबर येरगंळा पावली ।। तेधवां दादाजी राउत व पाटेल सर्व खुमाचा त्याणे आपला जमा सवे मेळवोन निस्याण लाविलें ।। छत्रि मुस्तेद केलि ।। काहाळा वाजविल्या ।। गावोंगाविचे सर्व मिळाले ।। मग मालवणिचे तळ्यावर जमा जाला ॥ तेथे पाईक पाईक जाली ॥ युद्ध तुंबळलें ।। पोईसरकर देसला मारिला ।। मालाडकर मरोळकर हारिस आणिले ।। निशाण आणि छत्रि सिंध्याहि नेलि ।। देसल्याचि मोड जालि ।। तेथोन येकमेकास हट वाढला ॥ त्या उपरांत सिंध्याचि वरात नोवरा नोवरि जुहांस जाता गोरगाविचे पाईकांहि लुट केली ॥ तें पाटलासि श्रृत जालें ।। त्याणे ठाण्यासि श्रृत केलें ॥ तर त्या ठाणकरांहि जाब केला ॥ जर देसलयासि कंबर बांधितात आपल्यासिं अपेश येईल ।। कां जर ते बहुत आपण जवळि असतां वाईट कां करावें ।। ऐसा जाब ठाणकरीं दिधला ॥ त्या जाबास येरगळकर मडकर उत्तनकर अकिसेकर मखेकर गो-हायेकर अणि जुकर हे अवघे येकत्र मिळोन विचार केला ॥ जर आह्मि शस्त्रधारि असतां अपेश शेशवंशास येईल ।। ह्मणोन जमा होवोन दिवानि पाणिसावंता जवंळ आले ॥ त्यासि वृतांत सांगितला ॥ जर आमचा अन्याय असेल तर आमचे पदरि घालणे ।। तेधवा दिवानि देसले अधिकारि नेले ।। त्यासिं दिवान विचारों लागला जर प्रथम कळ कोणि उभारिली ।। तें सत्यवचनि दिवानि सांगणे ।। तेधवां देसले बोलों लागले ॥ वृतांत सांगितला ।। तरि देसला कान्ह ठाकुर मारिला ॥ यांसि आंह्मासीं बिघडाव जाला ।। तो साहेबि निवडितां अनर्थ आहे ।। या बोलास दिवान उठिला ।। दोघांसि भेट केली ।। विडे दिधले ।। गांवोगावि पाठविले ॥ या परि सींधे आणि सोमवंशि यांसि वैर पडलें ॥ मग पाटेल दादराउत गोत्र हरिंद्र कुळस्वामिण हीरबा-देव उपनांव गव्हाणकर आपुले समुदायें वसईस आले ॥ विनायेक-तटाकि घरबंध केला ॥ त्याचे सवें खुमे आलि ।। ते कोण कोण ।। राउत गोत्र हरित कुळस्वामिण हीरबादेव उपनांव सावंखेडकर ।। पाटेल गोत्र रेणुक कुळदेवता योगेश्वरी उपनावं थेवखंडकर ॥ चौधरि गोत्र कपिलमुनि कुळस्वामिण वज्राये उपनावं घारवडिपुरा ॥ या उपरांत पांचघरकर राउत गोत्र आस्तिक कुळस्वामिण येकविरा ॥ हि च्यार खुभे प्रथमआलिं ।। अवघे आपुले समुदायें हाटवणि आले ।। विनायकतटाकिं राहिले॥ तेधवां कजिया येकमेकात पडला ।। जर टिळ्यास अधिकारी सावंखेडकर ।। तेधवां निवाडा जाला ।। जर प्रथम टिळा चोध-यांसि घारवडिपुरकरांसी ।। पहिला मान पानपटी ।। दुसरा रावासी ॥ गव्हाणकर आधिकारि ॥ दुसरा टिळा मान पानपटी ।। तिसरा पाटेल थेवखंडकरांसी टिळा मान पानपटी ।। चवथा पांचघरकरांसिं चवथा टिळा मान पानपटी ।। या उपर सांवंखेडकर पांचवा मान पानपटी ॥ ते ह्मातारे उपनावं ॥ सावा ठाकुरांसि मान टिळा विडा ।। हे ठाकुर वस्ति नारतळें तथोन आले ।। गोत्र कपिलध्वज कुळस्वामिण काळिका ।। उपनावं चांचरे ॥ यांसि मान सावा पानपटी ।। या खालते कुडु उपनावं पालवणकर गोत्र काशेश्वर कुळदेवता काळबादेव यांसि मान सातवा पानपटी ।। ७ ।। राणे आणि पुरो हे दोघे अधिकारि ।। सर्वेपणाचि प्रौढि तयांला ।। टिळ्याचे आधिकारि राणे गोत्र अंबऋषि कुळस्वामिण येकविरा ।। आणि पुरो गोत्र जमदाग्नि कुळस्वामिण त्वरिता ।। या उपर ठाकुर हे नारतळ्यासिं पुर्व ठीकाण गोत्र काशेश्वर कुळस्वामिण काळिका उपनावं नारतळें ।। या उपर राउत मागें आले गोत्र अंबरुषि कुळदेवत हे मांडवगडा पासोनि आले ।। त्यांस नावं मांडवगडकर पद जालें ।। ते हि अधिकारि टिळ्याचे २ ।। त्याहि कांधवळि वसविली ।। ते कांधवळि राहिले ।। या उपरांत ऐसें प्रकारें ही खुमे जागा टाकून आणिक जागा देशोदेश भरले ।। वछापुरि बारा पाखाडियांस वसाईत सोळा गावी वसाईत सोळागावकर प्रथक् प्रथक् राहिले ।। या उपर राज्ये हें तुरकाण फार बळकट जालें ।। म्लेंछ उत्तरपंथ पश्चमपंथ गुजराथ काबिज करित पैठणः चांपानेरः भागानगरः काबिज केलीः।। खंबैत हि घेतली ।। तेथें कीतिक युद्धं जालिं तीं लिहितां पध्येत फार होईल ॥ हें मात्र सकळित सांगतों ।। येथे मज विशेष गर्ज ।। जर पुढें भविष्योत्तर पुराणिचे संमत असे कीं हे वर्ण उत्तम फार पिडतिल ।। वर्णावर्ण वोळख जाईल ।। आपले कुळाची याद विसरतिल ।। तेधवां ब्राह्मण आपला अभिमान धरुन ह्या लेखाचा संग्रह ठेवितील व जे काहि राज्यअभिमानि ते हि फार या कुळावळिस जतन करोन रक्षीतिल ।। सत्यवंत सत्यसरश्वती हिचा शोध करितील ।।